वडिल इंग्रज तर आई हिमाचल प्रदेशची; तर पती बौद्ध भिक्खू; सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री
Ram teri ganga maili actress mandakini : वडिल इंग्रज तर आई हिमाचल प्रदेशची; तर पती बौद्ध भिक्षू; सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री

Ram teri ganga maili actress mandakini : ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री मंदाकिनी यांचे वडील जोसेफ यांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. तिचे वडील ब्रिटिश होते आणि त्यांचे नाव जोसेफ होते. मंदाकिनीने वडिलांच्या नावाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ आहे. तिचा जन्म मेरठमध्ये झाला. तिची आई हिमाचल प्रदेशची आहे. मंदाकिनी आपल्या वडील जोसेफ यांच्या निधनाने दुःखी झाली आहे. त्यांचे निधन 2 जुलै रोजी सकाळी झाले. इंस्टाग्रामवर वडिलांचा एक फोटो शेअर करत तिने एक भावनिक संदेश लिहिला.
मंदाकिनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आज मी प्रचंड दु:खात आहे... आज सकाळी मी माझे प्रिय वडील गमावले. त्यांच्या जाण्याचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही. पापा, तुमच्या अमर्याद प्रेमासाठी, ज्ञानासाठी आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. तुम्ही सदैव माझ्या हृदयात जिवंत राहाल.”
मंदाकिनीच्या चाहत्यांनीही तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. मंदाकिनी अशा कुटुंबातून आली आहे जिथे वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात.
वडील ब्रिटिश आणि आई हिमाचली असण्यासोबतच तिचे पती डॉ. काग्यूर टी. रिनपोछे हे एक बौद्ध भिक्षू राहिले आहेत. सध्या ते एक तिबेटी हर्बल सेंटर चालवतात. तर मंदाकिनी स्वतः तिबेटी योग सेंटर चालवते.
मंदाकिनीला रब्जे इनाया नावाची एक मुलगी आणि रब्बिल नावाचा एक मुलगा आहे. 1996 नंतर मंदाकिनीने चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पतीसोबत बौद्ध धर्म स्वीकारला.
राज कपूर यांच्या 1985 मध्ये आलेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ‘गंगा सहाय’ हे पात्र साकारत मंदाकिनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. राज कपूर यांनीच तिला मंदाकिनी हे ऑन-स्क्रीन नाव दिले होते.
'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून मंदाकिनीने पदार्पण केलं होतं. तिचं हे पदार्पण बॉलीवूडच्या सर्वात लक्षवेधी डेब्यूंपैकी एक मानलं जातं. त्यानंतर तिने 'डान्स डान्स', 'प्यार करके देखो', 'कहां है कानून' अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.
मंदाकिनी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिची आई हिमाचली पोशाखात एका क्लासिक बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























