'ती' TV मालिका इंटिमेट सीनमुळे आली चर्चेत, 17 मिनिटांत लिपलॉक अन्..; अभिनेत्याची बायको म्हणाली, मध्यरात्री अडीच वाजता
Ram Kapoor Reveals Truth Behind 17-Minute Intimate Scene: 'बडे अच्छे लगते हैं' या टिव्ही मालिकेतील 17 मिनिटांचा इंटिमेट सीन प्रचंड चर्चेत. या सीनवर राम कपूरची पत्नी नेमकं काय म्हणाली?

Ram Kapoor Reveals Truth Behind 17-Minute Intimate Scene: एकता कपूरची (Ekta Kapoor) 'बडे अच्छे लगते हैं' ही टेलिव्हिजनवरील मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर मुख्य भूमिकेत होते. ही जोडी अल्पावधीतच घराघरात पोहोचली. या मालिकेत इंटिमेट सीन देखील दाखवण्यात आला होता. हा इंटिमेट सीन 1-2 नसून तब्बल 17 मिनिटांचा होता. राम कपूर आणि साक्षी तंवर यांच्यातील हा इंटिमेट सीन होता. या सीनची प्रचंड चर्चा झाली होती. या सीनमुळे एकता कपूरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान, या सीनबाबत खुलासा राम कपूरने केला होता. हा सीन नेमका कसा शुट झाला? याचा खुलासा मुलाखतीतून रामने केला होता. दरम्यान, या सीनबाबत राम कपूरची पत्नी अभिनेत्री गौतमी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमी कपूरने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गौतमीला राम कपूरच्या 17 मिनिटांच्या इंटिमेट सीनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गौतमी म्हणाली, "रामने मला रात्रीच्या अडीच वाजता फोन केला होता. त्यानं फोनमधून सीनविषयी माहिती दिली. तेव्हा या सीनबाबत ऐकून मला धक्का बसला होता. कारण त्यावेळेस मी नुकतील आई बनली होती. मध्यरात्री मी स्तनपान करत होती. तेव्हा मी सीन समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते".
"तेव्हा रामचं बोलणं ऐकून घेतले आणि सरळ फोन कट केला. त्यानंतर मी शांत डोक्याने विचार केला. तेव्हा जाणवलं की मी जे काही केलं, ते योग्य नव्हतं. तेव्हा कलाकारांची शिफ्ट 24 ते 48 तासांपर्यंतची असायची. कामाच्या व्यापामुळे राम कधी कधी दोन दिवस घरी पण यायचा नाही. तेव्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर मला जरा अस्वस्थ वाटले होते. पण सेटवर रोमान्ससारखी गोष्ट नसते. तेथील वातावरण फार तणावपूर्ण असतं. त्यामुळे त्याच्यासोबत असं वागणं मला योग्य वाटलं नाही. जेव्हा राम शुट पूर्ण करून घरी आला, तेव्हा मी त्याला कडाडून मिठी मारली", असं तिनं सांगितलं.
या सीनबाबत एका मुलाखतीत राम म्हणाला, "अभिनेता म्हणून मी माझं काम केलं. एकता कपूरची इंटिमेट सीनची कल्पना होती. मी तिला 'तुला या सीनची खात्री आहे का?' असा प्रश्न विचारला. कारण टेलिव्हिजन विश्वात अशा प्रकारचा सीन कधीच शुट झाला नव्हता. एकता कपूर या सीनबाबत खूप कॉन्फीडंट होती. मी देखील या सीनसाठी होकार दिला", असं राम म्हणाले. दरम्यान, या इंटिमेट सीननंतर या मालिकेशी रेटिंग पाचवरून दोनवरून आली होती.























