Rakesh Roshan Birthday Story: ...म्हणून राकेश रोशन यांनी केलेलं टक्कल; त्यानंतर डोक्यावर कधीच आले नाहीत केस
Rakesh Roshan Birthday Story: दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना टक्कल का पडलं? आपला गोरापान रंग आणि ब्राऊन केसांनी अनेकींच्या गळ्यातील ताईत असलेल्या राकेश रोशन यांना अचानक टक्कल कसं पडलं?

Rakesh Roshan Birthday Story: राकेश रोशन (Rakesh Roshan) बॉलिवूड इंडस्ट्रीतलं मोठं नाव. या नावानं कधीकाळी रुपेरी पडदा गाजवला आणि त्यासोबतच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकापेक्षा एक हिट सिनेमेसुद्धा दिले. कधीकाळी दिग्गज दिग्दर्शक राकेश रोशन यांना कर्करोगानं ग्रासलेलं, पण कर्करोासारख्या आजावर मात करत त्यांनी त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शनाचा प्रवास कायम ठेवला. 1970 मध्ये घर-घर की कहाणी सिनेमाच्या माध्यमातून राकेश रोशन यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गोरापान रंग, घारे डोळे आणि हँडसम लूक यामुळे राकेश रोशन यांनी मोठं फॅनफॉलोविंग जमवलं. पण, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबाबत एक प्रश्न कायम पडलेला असतो, तो म्हणजे, राकेश रोशन यांचं टक्कल.
दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना टक्कल का पडलं? आपला गोरापान रंग आणि ब्राऊन केसांनी अनेकींच्या गळ्यातील ताईत असलेल्या राकेश रोशन यांना अचानक टक्कल कसं पडलं? असा प्रश्न अनेकांना पडलाय. राकेश रोशन यांचे आधीचे सिनेमे पाहिले आणि त्यानंतरचे त्यांचे सिनेमे पाहिले, तर त्यांचे एवढे सुंदर केस कुठे गेले? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करतो. राकेश रोशन यांना त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या दिग्दर्शनानं खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी 1987 साली खुदगर्ज या सिनेमातून दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली.
View this post on Instagram
...म्हणून राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस नाही
दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस का नाही, याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच चर्चा केली जाते. पण, यामागे एक मोठं कारण आहे. राकेश रोशन यांनी त्यांचे केस दान करण्याचा निर्णय घेतला होता. खुदगर्ज या सिनेमाचा तो एक रंजक किस्सा आहे. त्यावेळी त्यांनी सिनेमा हिट झाल्यावर तिरुपती बालाजीला केस दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी त्यांचा 'खून भरी मांग' या सिनेमाचंही शुटींग सुरू होतं. या सिनेमाच्या शुटींगवेळी ते त्यांच्या पत्नीसह तिरुपती बालाजीला गेले आणि त्यांच्या पत्नीनं त्यांना त्यांच्या नवसाची आठवण करुन दिली. त्यावेळी राकेश रोशन यांनी टक्कल केलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर केस आलेच नाहीत.
दरम्यान, राकेश रोशन यांनी 'आखिर क्यों?' या सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं. हा सिनेमा 1985 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता आणि 'दुष्मन ना करे दोस्त ने जो काम किया है' चित्रपटातील एक गाणे तेव्हापासून आजपर्यंत लोकांच्या ओठांवर आहे.राकेश रोशन यांचे वडील प्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार होते. त्यांच्या वडिलांची ही गुणवत्ता त्यांचे भाऊ राजेश रोशन यांच्यापर्यंत पोहोचली आणि आज त्यांची इंडस्ट्रीत प्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळख आहे. तसेच, राकेश रोशन यांचा मुलगा म्हणजे, हृतिक रोशन, आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.























