एक्स्प्लोर

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तापामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे.

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, त्यांच्या स्थितीत चढ-उतार कायम आहेत. नुकतेच त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा ताप आल्याने राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे.    

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांच्या हात-पायांमध्ये हालचालही दिसून आली होती. ते उपचारांनाही प्रतिसाद देत होते, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

100 डिग्रीच्या वर ताप 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100 डिग्री ताप आल्याने राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्क्यांपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत. चाहते, कुटुंबीय आणि त्यांचे मित्र त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. जॉनी लिव्हर, सुनील पाल आणि अनेक विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी रुग्णालयात देखील गेले होते.

सोशल मीडियावर दिली हेल्थ अपडेट

राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती देत ​​आहेत. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिले होते- 'प्रिय हितचिंतक माझे वडील राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. एम्स दिल्ली येथील डॉक्टर आणि त्यांची टीम राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक होण्यासाठी मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांचे आभार मानतो. मी सर्वांना विनंती करते की तुमचे प्रेम आणि प्रार्थना सुरु ठेवा.'

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. त्यांना व्हेंटिलेटरवर  ठेवण्यात आले होते. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget