एक्स्प्लोर

Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल

Zee Marathi Awards 2026 Performance: झी मराठी अवॉर्ड्स 2026 मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज.

Zee Marathi Awards 2026: मालिकांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांनी (Villian Roles) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार यावेळी झी मराठी अवॉर्ड्स 2026 मध्ये (Zee Marathi Awards 2026) एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या परफॉर्मन्समध्ये प्रत्येक पात्राची खासियत आणि ताकद एका वेगळ्या रूपात सादर केली जाणार आहे. प्रत्येक खलनायकाला एका विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. या खास परफॉर्मन्समध्ये 'कृष्णाईच्या लेकी' मालिकेतील इंदुराणी, 'दीपज्योती' मालिकेतील प्रीती, 'लक्ष्मी निवास' मालिकेतील (Zee Marathi Serials) जयंत', 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील भैरवी आणि 'कमळी' मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत. 

झी मराठी अवॉर्ड्समध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज (Zee Marathi Awards 2026 Negative Roles Actors Performance)

 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव सांगतो, “हा परफॉर्मन्स माझ्यासाठी एकदम वेगळा अनुभव होता! मी याआधी कधीही असं काही केलं नव्हतं. आम्ही सुरुवातीला रिहर्सल केल्या. आमचे कोरिओग्राफर यांनी हा परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने तयार केला. त्यांनी मला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे अनुष्काला 'व्हॅम्पायर डायरीज' ही मालिका खूप आवडते. जेव्हा मी तिला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायर बनणार आहे, तेव्हा ती माझ्यापेक्षाही जास्त उत्सुक झाली होती. आम्ही या परफॉर्मन्ससाठी थोडा सराव केला होता. पण प्रत्यक्ष परफॉर्मन्सच्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो, कारण मी काही नैसर्गिकरीत्या उत्तम डान्स करणारा कलाकार नाही. जेव्हा मला सांगितलं की, हा परफॉर्मन्स थेट प्रेक्षकांसमोर होणार आहे, तेव्हापासून माझ्या काही रात्री झोपेशिवाय गेल्या. कारण प्रेक्षकांसमोर डान्स करणं हा माझ्यासाठी अगदी नवीन अनुभव होता आणि त्यामुळे जबाबदारीही मोठी होती. काही तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या अडचणींमुळे आम्हाला हा परफॉर्मन्स आधीच शूट करावा लागला. पण रात्रभर शूटिंग करूनही, फक्त तीन तासांची झोप घेऊन मी परफॉर्मन्ससाठी आलो. माझं संपूर्ण लक्ष परफॉर्मन्सवर होतं. शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन केलं होतं आणि देवाच्या कृपेने ते छान जमलं. आता हा परफॉर्मन्स टीव्हीवर कधी पाहायला मिळतो, याची मला उत्सुकता आहे.”

'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत इंदुराणीची भूमिका साकारणारी साक्षी गांधी सांगते, “मी लहानपणापासून झी मराठी बघत आले आहे. कधी वाटलंही नव्हतं की, आपण एखादी मालिका करू. याआधी मी झी मराठीवर कॅमिओ केला आहे. पण यावर्षी मी झी मराठीवर मुख्य खलनायिकेची भूमिका साकारतेय. बऱ्याचदा हे सगळं  स्वप्नवत  वाटतं. पण हे सगळं मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत असतं. हे माझं झी मराठी अवॉर्ड्सचं पहिलं वर्ष आहे. आम्ही खूप मज्जा केली. माझा डान्ससुद्धा होता. अशा कार्यक्रमांमध्ये सगळे कलाकार एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे हा आपल्या घरातल्याच सोहळ्यासारखा वाटतो. संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. धमाल, मज्जा आणि मस्ती असते. कोणाला पुरस्कार मिळेल, याची उत्सुकता असते. अशा अनेक गोष्टींमुळे हा सोहळा परिपूर्ण होतो. तुम्हालाही हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे.”

खलनायकांच्या अनोख्या रूपांची झलक, दमदार नृत्य आणि कलाकारांची धमाल यामुळे झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तेव्हा हा रंगतदार सोहळा पाहायला विसरू नका!

झी मराठी अवॉर्ड्स 2026, शनिवार, 31 ऑक्टोबर आणि रविवार, 1 नोव्हेंबर, संध्या 7 वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर!

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
Zee Marathi Serials: कुठे प्रेमाची कबुली, कुठे नात्यांची कसोटी, तर कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक ट्वीस्ट
कुठे प्रेमाची कबुली, कुठे नात्यांची कसोटी, तर कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक ट्वीस्ट
Sachin Pilgaonkar Madhuri Dixit KBC: सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Prajakta Gaikwad Photos: कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Embed widget