(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Black Buck poaching Case: सलमानला राजस्थान हायकोर्टाचा दिलासा
सलमानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली उपस्थित राहण्याची याचिका केली होती.
जोधपूर : 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला आज (६ फेब्रुवारी) होणाऱ्या सुनावणीसाठी व्हर्च्युअली उपस्थित राहण्याची अनुमती दिली आहे.
सलमानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली उपस्थित राहण्याची याचिका केली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईहून जोधपुरला येणे धोकादायक आहे, त्यामुळे व्हर्च्युअली उपस्थित राहण्याची अनुमती द्यावी, अशी याचिका सलमानने केली होती.
मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती दिनेश मेहता यांच्या खंडपीठाने याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे सलमानला सुनवाणीसाठी जोधपूरला जाण्याची गरज नाही.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
कोणकोणत्या केस दाखल
- कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते.
- घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
- भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
- शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली.
सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे.
संबंधित बातम्या :