Rajkumar Hirani Birthday: 'ए मामू.. जादू की झप्पी..'काबील बनो काबील..,हिराणींच्या चित्रपटातील हे डायलॉग ठरले सर्वात सुपरहीट
आमीर खान असो, रणवीर असो की अनुष्का शर्मा असो बॉलिवूडच्या कित्येक दिग्गज कलाकारांसोबत राजकुमार हिराणी यांनी काम केलं आहे.
Rajkumar Hirani Birthday:बॉलिवूडच्या विश्वात आपल्या एकाहून एक कलाकृतींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिराणी आज २० नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतोय. ए मामू,, जादू की झप्पी देदे और खतम कर.. काबील बनो काबील कामयाबी तो ..असे कितीतरी डायलॉग प्रेक्षकांच्या तोंडावर अगदी आताही आहेत.
आमीर खान असो, रणवीर असो की अनुष्का शर्मा असो बॉलिवूडच्या कित्येक दिग्गज कलाकारांसोबत राजकुमार हिराणी यांनी काम केलं आहे. वर्षा दोन वर्षांनी एखादा चित्रपट घेऊन येणाऱ्या हिराणींचं दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. त्यांच्या चित्रपटांमधल्या डायलॉगलाही प्रेक्षकांनी आतापर्यंत डोक्यावर घेतलं आहे.
राजकुमार हिराणींच्या थ्री इडियट्समधले फेमस डायलॉग
'दोस्ती फेल हो जाए तो दुख नहीं होता.. लेकिन दोस्त फस्ट आए तो ज्यादा दुख होता है' बच्चे काबिल बनो, काबिल... कामयाबी तो साली झक मारके पीछे भागेगी' हे डायलॉग थ्री इडियट्स फॅन्सच्या तोंडून आजही सहज येतो. २००९ साली प्रदर्शित झालेला थ्री इडिएट्स हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहातात. या सिनेमातले तसे सगळेच डायलॉग फेमस आहेत.
पिके चित्रपटातील आमिरचा डायलॉग झाला फेमस
२०१४ मध्ये आलेला पिके चित्रपटही तुफान हीट ठरला तो त्यातील डायलॉगमुळे. हिरांणींचं दिग्दर्शन असणारा या चित्रपटानं एक वेगळाच स्टँडर्ड सेट केलाय. 'शादी ब्याह में पटाखे फोडके बँड बाजा बजाके... काहे पुरे शेहेर को बताया जाता है की आज I Am Having Sex' हा डायलॉग आजही सर्वांच्या लक्षात आहे.
मुन्नाभाई MBBS तर गाजला मुन्ना सर्किटच्या डायलॉगने
शिवाय बॉलिवूडच्या फॅन्सचा लाडका मुन्ना भाई MBBS चित्रपट गाजला तो मुन्नाभाईसह त्याच्या जादू च्या झप्पीमुळं. या चित्रपटातील सर्किट आणि मुन्नाभाईचे डायलॉगही हीट ठरले. ये रानी अपूनकी.. 'ए मामू... जादू की झप्पी देदे और खतम कर...' लाईफ मे जब टाईम कम रहेगा तो डबल जिनेका असे किती तरी डायलॉग हीट ठरले.