VIDEO : मखमली...राजेश्वरी खरातचा नदीकाठी रोमँटिक अंदाज, कलवरी चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर
Rajeshwari Kharat Makhamali song video : मखमली...राजेश्वरी खरातचा नदीकाठी रोमँटिक अंदाज, कलवरी चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर

Rajeshwari Kharat Makhamali song video : अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या कलवरी या सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर आज (दि.16) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Rajeshwari Kharat Makhamali song video) मखमली असं या गाण्याचा नाव असून हा टीझर राजेश्वरी खरात हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय. राजेश्वरी खरातने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. (Rajeshwari Kharat Makhamali song video) मखमली या गाण्यात राजेश्वरी खरातचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
राजेश्वरी खरातच्या मखमली या गाण्याचे लिरीक्स Pradip B Tonge यांनी लिहिले असून हे गाणं Onkar swaroop यांनी हे गाणं गायलं आहे. Pradip B Tonge आणि Mangesh Vaijinath Shendge यांनी गाण्याचं दिग्दर्शन केलंय. दरम्यान, गाण्याचा टीझर समोर येताना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या गाण्याला तुफान प्रतिसाद दिलाय. मखमली या गाण्यात राजेश्वरी खरातचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. राजेश्वरी सोबत Rahul Darad याचा खास डान्स पाहायला मिळतोय. ग्रामीण भागात नदीकाठी या गाण्याचं शूटिंग पार पडलंय. (Rajeshwari Kharat Makhamali song video)
राजेश्वरी खरात ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयातून तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. साधेपणातला देखणेपणा, नैसर्गिक अभिनय आणि प्रामाणिकपणे केलेली प्रत्येक भूमिका यामुळे ती अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. तिच्या कामगिरीतून दिसून येते की ती केवळ व्यावसायिक यशासाठी नव्हे, तर दर्जेदार कलाकृतींसाठीही मेहनत घेते.(Rajeshwari Kharat Makhamali song video)
चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व क्षेत्रांत तिने स्वतःचा ठसा उमटवला आहे. राजेश्वरी खरातच्या करिअरची सुरुवात फँड्री सिनेमातील शालूच्या भूमिकेपासून झाली. मात्र तिच्या मेहनतीमुळे आणि आत्मविश्वासामुळे ती पुढे मुख्य भूमिकांमध्ये झळकू लागली. तिचा चेहरा प्रेक्षकांना आपलासा वाटतो, कारण ती जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हा तिच्यातील निरागसता, भावनांचा ओलावा आणि वास्तवतेशी साधर्म्य असलेला अभिनय सहज लक्ष वेधून घेतो.(Rajeshwari Kharat Makhamali song video)
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sholay सिनेमातून सचिन पिळगावकरांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन हटवला होता, 50 वर्षांनी कारण समोर!
संगमनेरमध्ये जाऊन संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब थोरातांना का पाडलं? हरिनाम सप्ताह सोहळ्याला हजेरी























