एक्स्प्लोर

Raja Shivaji: इतिहासाच्या गर्जनेची चाहूल ! ‘राजा शिवाजी’च्या भव्य फर्स्ट लूक टीझरला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचे वचन देणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Raja Shivaji: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, तसेच रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका साकारलेला ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. सध्या निर्मितीच्या टप्प्यात असलेल्या चित्रपटांमध्ये ‘राजा शिवाजी’ हा निःसंशयपणे सर्वात भव्य चित्रपट मानला जात आहे. ३१ मार्च रोजी या चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ डिजिटल माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आणि या अनपेक्षित सरप्राईजने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. भारताच्या महान योद्धा राजांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचे वचन देणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

भव्य सेट्स, नेत्रदीपक, प्रभावी व्यक्तिरेखा

‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या विशेष नाट्यमय पूर्वावलोकनादरम्यान (theatrical preview) या टीझरने प्रचंड उत्साह निर्माण केला होता. थिएटरमधील त्या अनुभवाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतरही या ‘फर्स्ट लूक टीझर’ची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना, प्रभावी व्यक्तिरेखा, दमदार संवाद आणिअंगावर शहारे आणणाऱ्या  अजय-अतुल यांच्या पार्श्वसंगीतामुळे ‘राजा शिवाजी’ची ही पहिली झलक प्रेक्षकांच्या मनावर ठाम आणि खोलवर ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे.

चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या प्रचंड उत्सुकतेचे आणि यशाची झलक दाखवत आहे. एका प्रेक्षकाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “रितेश आणि जिनिलिया महाराष्ट्राचा विस्मृतीत गेलेला इतिहास पुन्हा जिवंत करत आहेत, हे पाहून खूप अभिमान वाटतो. त्यांना मानाचा मुजरा! या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. जय शिवाजी महाराज… जय महाराष्ट्र… हर हर महादेव!” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "रितेश सर, हा चित्रपट नक्कीच सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर ठरणार. या चित्रपटामागचा तुमचा हेतू अत्यंत पवित्र आहे, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा! जय शिवराय!"

या टीझरने सिनेमॅटिक स्तरावरही प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. एका प्रेक्षकाने याचे वर्णन “हा खरा सिनेमाचा परिपूर्ण अनुभव आहे!” असे केले, तर दुसऱ्याने म्हटले, “रितेश सरांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात पाहताना खूप अभिमान वाटतो. जय हिंद!” काही प्रतिक्रिया अत्यंत भावनिक होत्या“अंगावर रोमांच उभे राहिले! रितेश विलासराव देशमुख यांचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनय खरोखरच पुढच्या स्तराचा आहे. इतिहास पुन्हा गर्जना करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट आम्ही नक्की पाहणार!” असे एका चाहत्याने लिहिले. तर दुसऱ्याने आत्मविश्वासाने म्हटले, “हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल होतील!” संगीताबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एका चाहत्याने स्पष्टपणे प्रतिक्रिया देताना म्हटले, “मी हा चित्रपट फक्त अजय-अतुल यांच्या संगीतासाठीसुद्धा पाहीन!” तर दुसऱ्याने रितेश विलासराव देशमुख यांच्या अभिनयाचे कौतुक करत म्हटले, “रितेश सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तुमचा अभिनय अत्यंत प्रभावी आहे!”


Raja Shivaji: इतिहासाच्या गर्जनेची चाहूल ! ‘राजा शिवाजी’च्या भव्य फर्स्ट लूक टीझरला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

तारकांचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या कलाकारांनाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश विलासराव देशमुख अशा दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे. एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “स्टारकास्ट खूपच योग्य निवडलेली आहे आणि अत्यंत प्रभावशाली वाटते.” तर दुसऱ्याने नमूद केले, “अभिषेक बच्चन यांची संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवड अतिशय उत्कृष्ट आहे!” आणखी एका चाहत्याने लिहिले, “संजय दत्त हे नेहमीच प्रभावी असतात; त्यांची उपस्थितीच चित्रपटाला वेगळी उंची देते.”

प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव मिळणार

‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून, तो ‘स्वराज्य’ या संकल्पनेवर आधारित एक भव्य ऐतिहासिक गाथा आहे. एका तरुण राजाने घेतलेल्या पवित्र शपथेपासून ते इतिहासाचा प्रवाह बदलणाऱ्या त्याच्या अद्वितीय प्रवासापर्यंतची ही कथा प्रेक्षकांना प्रेरणा देणारी ठरेल. भव्य ॲक्शन प्रसंग, भावनिक कथानक आणि उच्च दर्जाच्या तांत्रिक सादरीकरणामुळे हा चित्रपट एक संपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे. तसेच संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन आणि अजय-अतुल यांचे दमदार संगीत यामुळे या चित्रपटाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये इतिहासाची भव्यता आणि वास्तवतेची झलक पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव मिळणार आहे.

'जिओ स्टुडिओज'द्वारे सादर करण्यात आलेला आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया रितेश देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली अध्याय नव्या पिढीसमोर भव्य, भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूपात उलगडला जाणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा केवळ चित्रपट नसून एक भव्य सिनेउत्सव ठरणार असून, इतिहास आणि मनोरंजन यांचा संगम अनुभवण्याची एक सुवर्णसंधी प्रेक्षकांना देणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget