Raj Thackeray Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut Mahesh Manjrekar: ठाकरे बंधू एकत्र येण्याचं पहिलं पाऊल ज्यांच्यामुळे पडलं तेच आता राज-उद्धव यांची मुलाखत घेणार, 6 जानेवारीच्या महामुलाखतीची उत्सुकता
Raj Thackeray Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut Mahesh Manjrekar: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे. यासंदर्भात खुद्द शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.

Raj Thackeray Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut Mahesh Manjrekar: मुंबईत महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात (Politicle Updates) मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. यंदाच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे, ठाकरे बंधूंचं मनोमिलन. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Election 2026) निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आणि मनसे (MNS) यांची युती झाली असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र निवडणूक लढवणार आहेत. दोघांनी जागावाटप आटोपला असून आपापले हुकमी एक्के निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ठाकरे बंधूंची युती मुंबई (Mumbai Elections 2026) आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड ठरली. अशातच आता जोरदार प्रचार सुरू होणार आहेत. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे. यासंदर्भात खुद्द शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाईल. ठाकरे बंधूंची एकत्रित ही पहिलीच मुलाखत असणार आहे."
"मनसे शिवसेना संयुक्त नामा सुरू आहे.यावेळेला संयुक्त मुलाखत दोघांनी मान्यता दिली. यावेळी महेश मांजरेकरांसोबत मुलाकात घेवू... त्यांनी सुरुवात केली, त्यामुळं संयुक्त सुरुवात केली... ही मुलाखत सहा तारखेला होईल त्यानंतर प्रदर्शित होईल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत असेल..."
ठाकरे बंधू एकत्र येण्यात महेश मांजरेकरांचीही मोठी भूमिका
राज ठाकरे यांनी बोलताना ज्या मुलाखतीचा उल्लेख केला ती मुलाखती अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी घेतली होती. महेश मांजरेकर यांनी काही महिन्यांआधीच त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. Wacko Sanity या त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखीत बोलताना राज ठाकरेंनी "कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे", हे वक्तव्य केलं होतं. युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरेंनी या वाक्याची आठवण करुन दिली आणि म्हणाले की, "मला असं वाटतं की आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली..."
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची संजय राऊत संयुक्त मुलाखत घेणार























