Rahat Fateh Ali Khan : आधी माज, नंतर माफी; नोकराला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच राहत फतेह अली खान यांचा माफीनामा
Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत.
Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओची जबाबदारी घेत त्यांनी माफी मागितली आहे.
राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) नोकराला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केले होते. दरम्यान, आता राहत फतेह अली खान यांना उपरती आली असून त्यांनी माफी देखील मागितली आहे. दारुची बाटली गायब झाल्याने त्याला नोकराला चप्पलेने मारहाण करण्यात आली आहे. शिवाय त्यांनी त्याच्या कानशिलातही लावली आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार, गायक फतेह अली खान यांनी माफीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये गायकाने हे प्रकरण उस्ताद आणि त्याच्या शागिर्दमधील असल्याचे म्हटले आहे. मारहाण केलेल्या व्यक्तीचा परिचय दिला आहे. त्याने नवीद हसनैन असे त्याचे नाव असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, त्याने बॉटल हरवली आणि त्यानंतर तो विसरला.
मारहाण करण्यात आलेला नोकरही आला समोर
Rahat Fateh Ali Khan यांनी मारहाण केलेला नोकरही समोर आला असून त्याने याबाबत भाष्य केले आहे. नवीद हसनैन म्हणाला, ज्याने हा व्हिडीओ लीक केलाय, त्याचा माझ्या गुरुला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तो माझ्या गुरुला एकप्रकारे ब्लॅकमेल करत आहे. मारहाण केल्यानंतर राहत यांनी त्याची माफी मागितली असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये हिट गाणी
राहत फतेह अली खान यांचे अनेक गाणे बॉलिवूडमध्ये हिट ठरले आहेत. त्यांनी अनेक सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. टिव्ही सिरियल्सचे 50 पेक्षा जास्त ट्रॅक आणि बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही मिळून 100 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत.
राहत यांनी गायलेली गाणी
राहत फतेह अली खान यांनी गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. 'तू बिछड़न', 'तेरी ओर','ओ रे पिया', 'तेरी मेरी', 'तुम जो आए' 'तेरे मस्त मस्त दो नैन' यांसारख्या अनेक हिट गाण्यांचा समावेश आहे. फक्त बॉलिवूडचा नाही तर हॉलिवूडमध्येही त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या