'मन धावतंया तुझ्याच मागं...' मराठी पॉप गाणारी गोड गळ्याची राधिका भिडे कोण? 'आय पॉपस्टार'मध्ये धुमाकूळ घालतेय सौंदर्याची खाण असलेली 'कोकणकन्या'
तिच्या आवाजातली गोडी, शब्दांमधली भावना आणि तिचा आत्मविश्वास या सगळ्यांनी ती लाखोंची मनं जिंकली आहेत.

Radhika Bhide: सध्या सोशल मीडियावर ‘आय पॉपस्टार’ या नव्या संगीत कार्यक्रमाच्या प्रोमोनं चांगलंच लक्ष वेधलं आहे . ( I popstar reality show ) मराठमोळा साज, चेहऱ्यावर गोड हसू आणि तेवढाच मधाळ, गोड गळ्याच्या एका तरुणीने लाखोंची मन जिंकली आहेत . या कार्यक्रमात 'मन धावतया तुझ्याच मागं' गाणारी गोड, मोहक चेहऱ्याची तरुणी राधिका भिडे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतेय .. तिच्या मधाळ हास्यासोबतच तिचा सुमधुर आवाज संगीतप्रेमींच्या मनात घर करून गेला आहे. मंचावर मराठमोळ्या लुकमध्ये आलेली राधिका जेव्हा गायलाच सुरुवात करते, तेव्हा परीक्षकांसकट प्रेक्षकही तिच्या सुरांमध्ये हरवून जातात. (I Popstar Reality Show)
राधिकानं कार्यक्रमात ‘मन धावतया’सोबतच ‘पुन्हा पुन्हा’ हे गाणंही सादर केलं असून दोन्ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. या प्रचंड प्रतिसादामुळे तिच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे.
'मन धावतंया' गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
‘आय पॉपस्टार’ या कार्यक्रमात राधिकाने सादर केलेलं ‘मन धावतया तुझ्याच मागं’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या सादरीकरणाने परीक्षक, प्रेक्षक आणि संगीतप्रेमी सर्वांनाच भुरळ घातलीय. पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात मंचावर येऊन जेव्हा राधिका गायलाच सुरुवात करते, तेव्हा वातावरणच बदलून जातं. तिच्या आवाजातली गोडी, शब्दांमधली भावना आणि तिचा आत्मविश्वास या सगळ्यांनी ती लाखोंची मनं जिंकली आहेत.
राधिका सांगते, “कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझे फक्त 19 हजार फॉलोअर्स होते. पण ‘मन धावतया’ गाणं व्हायरल झाल्यानंतर आता ते 86 हजारांहून अधिक झाले आहेत. लोकांचा हा प्रेमळ प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.”
View this post on Instagram
‘आय पॉपस्टार’ या शोची थीमही आगळीवेगळी
‘आय पॉपस्टार’ या शो आगळीवेगळी थीम घेऊन समोर आला आहे .या शोचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आठवड्यात दिलेल्या थीमनुसार स्पर्धकांना स्वतःचं गाणं लिहायचंय . त्याला संगीत द्यायचंय आणि ते गाणं मंचावर सादर करायचंय. एवढंच नाही तर त्या गाण्यांना सोशल मीडियावर किती लोकप्रियता मिळते, हेही निकालात गणलं जाणारय.
राधिका म्हणते, “गाण्याचे शब्द सुचवणं आणि त्याला अर्थपूर्ण संगीत देणं ही प्रक्रिया आव्हानात्मक असते, पण त्यातूनच माझ्या कौशल्यांना धार मिळते आहे. ‘आय पॉपस्टार’ने मला माझ्या मूळ गाण्यांसाठी योग्य व्यासपीठ दिलं.”
कोण आहे राधिका भिडे कोण आहे ?
राधिकाचा संगीतप्रवास मात्र इथपर्यंतच मर्यादित नाही. रिअॅलिटी शोपूर्वी तिनं ‘ताजा खबर 2’, ‘दे धक्का 2’ आणि ‘हर हर महादेव’ या प्रकल्पांसाठी बॅकग्राऊंड स्कोर आणि व्होकल प्रॉडक्शन केलं आहे. त्याशिवाय काही गुजराती गाण्यांसाठीही ती काम करत होती. लवकरच तिची काही स्वतंत्र सिंगल्स रिलीज होणार आहेत, ज्यांपैकी एका गाण्याचे बोल लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.
























