'3 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप..', राधा पाटीलचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध गायक, बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी केल्या उघड
तिने सांगितलं की ती तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील स्पर्धक राधा पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. राधा पाटील तिचा आणि गौतमी पाटील सोबतच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे याआधी चर्चेत आली होती. पण आता बिग बॉसच्या घरात राधाने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला ती थोडी शांत होती पण आता तिने पुन्हा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या चारित्र्यहनन झाल्याच्या मुद्द्यावरून राकेश, अनुश्री आणि रुचिता जामदारमध्ये चांगलीच वादावादी झाल्याच दिसलं. याच भागात राधा पाटीलने तिचा वैयक्तिक नात्याविषयीचा खुलासा केलाय. तिने सांगितलं की ती तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.
नेमकं काय म्हणाली राधा?
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर काहीशी शांत झालेली राधा आता पुन्हा एकदा जोमाने खेळ खेळू लागली आहे. खरंतर घरात येतानाच ' गौतमी पाटीलला घाबरत नाही' असं म्हणत तिने तिचा ठसका दाखवून दिला होता. आता वैयक्तिक आयुष्याबद्दल ती बोलली आहे. बिग बॉसच्या घरात अनुश्रीला ती सांगत होती. ती म्हणाली " गेली तीन वर्ष मी रिलेशनशिपमध्ये आहे. माझा 2 बीएचके आहे. त्यात आमची वेगळी बेडरूम आहे. ' तो असा आहे ना की मला कोणी काही बोललं तर तो समोरच्याला फाडून टाकेल.त्याला कशाचं व्यसन नाहीये. तीन वर्षात तो स्वतःच्या हाताने कधीही जेवला नाही. मी नेहमी त्याला माझ्या हाताने भरवते. मला असं वाटतं की काय होत असेल त्याचं. मुलींना जसं वाटत असतं की आपल्याला देसी बॉय हवा. तसाच आहे तो. इथे एवढे सगळे लोक मला बोलतात. तो जर इथे असला असता तर त्यांना मारून निघून गेला असता.
View this post on Instagram
अनुश्री राधाच्या बॉयफ्रेंडची फॅन
दरम्यान अनुश्री राधाला सांगते की, ती राधाच्या बॉयफ्रेंडची फॅन आहे. तिला त्याचं गाणं खूप आवडत असल्याचंही अनुश्रीने सांगितलं. अनुश्रीच्या बोलण्यावरून राधाचा बॉयफ्रेंड लोकप्रिय गायक असल्याचं या भागात समोर आलं. मग राधा ही म्हणाली की खूप जण त्याच्यासाठी वेडे आहेत. फोटो काढता नाही तू माझा हात कधी सोडत नाही. तीन वर्षे झाली आहेत तरी आमच्यातील प्रेम कमी झालं नाही. त्याची आठवण आली की मला खूप रडायला येतं . यावेळी ती तिच्या बॉयफ्रेंडचं नावही सांगते पण एपिसोडमध्ये ते म्युट करण्यात आलं आहे.























