Pushpa 2 Worldwide Collection: 'पुष्पा 2'नं मोडले 'बाहुबली 2'चे सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स; वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पुष्पाभाऊ अव्वल
Pushpa 2 Beat Baahubali 2: 'पुष्पा 2' नं वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2' ला चितपट केलं आहे. आता पुष्पा 2 भरतातील दुसरी सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म बनली आहे.
Pushpa 2 Worldwide Collection: 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) नं जगभरात आपला झेंडा फडकवला आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर चित्रपटानं फक्त देशांतर्गतच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Worlwild Collection) 'बाहुबली 2' (Bahubali 2) ला मागे टाकलं आहे आणि आता भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि दररोज कोटींच्या कलेक्शनसह नवनवे विक्रम रचत राहिला आणि चित्रपट आता 1800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून फक्त काही पावलं दूर आहे. 'पुष्पा 2'चं प्रोडक्शन हाऊस माइथ्री ऑफिशिअलनं या चित्रपटाचे 28 दिवसांचे धमाकेदार आणि रेकॉर्ड ब्रेकिंग दमदार वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केलं आहे.
4 आठवड्यात वर्ल्डवाईल्ड 1799 कोटींची कमाई
माइथ्री ऑफिशियलच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टरवर फिल्मचं वर्ल्डवाईड कलेक्शन मेंशन करण्यात आलं आहे. यानुसार, 'पुष्पा 2'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 1799 कोटींचं दमदार कलेक्शन केलं आहे. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '''पुष्पा 2 : द रूल' आपल्या रेकॉर्ड तोड प्रदर्शनसह भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. वाईल्डफायर ब्लॉकबस्टरनं फक्त 4 आठवड्यात जगभरात 1799 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
'पुष्पा 2' नं 'बाहुबली 2' ला चारली धूळ
28 दिवसांच्या वर्ल्डवाईड कलेक्शनसह 'पुष्पा 2' नं 2017 मध्ये रिलीज करण्यात आलेली ब्लॉकबस्टर फिल्म 'बाहुबली 2'वर मात केली आहे. 1788.06 कोटींच्या वर्ल्डवाइड कलेक्शनसह प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या या चित्रपटानं जगभरात दुसरा सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा किताब आपल्या नावे केला होता. पण, आता 1799 कोटी रुपयांचं कलेक्शनसोबत 'पुष्पा 2'नं आता हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. पहिल्या नंबरवर आताही आमिर खानचा 'दंगल' आहे, ज्यानं जगभरात 2070.3 कोटींची कमाई केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :