Pushpa 2 Pre-Booking : 'पुष्पा 2' ची प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई, प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन
Pushpa 2 Pre-Booking Collection : 'पुष्पा 2' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाने प्री बुकिंगमधून 10 लाख डॉलर कमावले आहेत.
![Pushpa 2 Pre-Booking : 'पुष्पा 2' ची प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई, प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन pushpa 2 the rule Pre Booking Collection earned rs 1000 crore from pre release business allu arjun rashmika Mandanna marathi news Pushpa 2 Pre-Booking : 'पुष्पा 2' ची प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई, प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/4b22375ee25c65305d2f384f15ff66d21732245178240322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa 2 The Rule Pre-Booking : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुचर्चित 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई केली आहे. अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच नाही, विदेशातही पाहायला मिळत आहे. पुष्पा 2 चित्रपटाने अमेरिकेत दहा लाख डॉलर कमावले आहेत. अमेरिकेतील प्रीमियर शोच्या तिकीट विक्रीतून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 10 लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे.
'पुष्पा 2' ची प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई
अमेरिकेत 'पुष्पा 2' या चित्रपटाचा प्रीमियर 4 डिसेंबरला होणार असून ऍडव्हान्स तिकीट बुकिंगसाठी प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. आतापर्यंत अमेरिकेतील 850 लोकेशनवर या चित्रपटाची 40 हजार तिकिटे विकली गेली असून यातून निर्मात्यांनी दहा लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे. 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपट येत्या 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. नेटफ्लिक्सने पुष्पा 2 चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल 275 कोटींना खरेदी केले आहेत.
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर रचणार नवा विक्रम?
'आरआरआर' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' पेक्षा पुष्पा 2 चित्रपट जास्त धमाका करेल, अशी अपेक्षा आहेत. पुष्पा 2 चित्रपटाने प्री-रिलीज कलेक्शनमधेच कोट्यवधींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे जगभरातील थिएटर मूल्य अंदाजे 1000 कोटी रुपये आहे. असं झाल्यास ऑस्कर विजेते चित्रपट 'RRR' आणि 'KGF Chapter 2' पेक्षा पुष्पा 2 चित्रपटाचं यश मोठं असेल. पुष्पा 2 चित्रपट केवळ तेलुगु चित्रपटसृष्टीतच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम रचण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी फक्त काही आठवडे शिल्लक असताना चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पुष्पा 2 ने रिलीज आधी प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन केलं आहे. काही मीडिया तज्ज्ञांच्या मते, 'पुष्पा 2' या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pushpa 2 Trailer : पुष्पा नाम नहीं ब्रँड हैं... फ्लावर नहीं वाईल्ड फायर... पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)