Pushpa 2 OTT Release: कोणत्या प्लॅटफॉर्मनं विकत घेतले 'पुष्पा 2: द रुल'चे OTT राईट्स? किती कोटींची डील कन्फर्म?
Pushpa 2 OTT Rights: पुष्पा 2 चित्रपटगृहात दाखल झाला आहे. लोकांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मनं त्यांचे अधिकार सुरक्षित केले आहेत.
Pushpa 2 OTT Release Rights: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) अखेर जगभरात रिलीज झाला. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होता, अखेर थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. पुष्पाचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट अखेर रुपेरी पडद्यावर झळकला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. त्यामुळेच चित्रपटाचं बंपर ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. यासह 'पुष्पा 2 द रुल'ची सुरुवात चांगली झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फुल्ल ऑन पैसा वसुल, अशी एकच प्रतिक्रिया सर्वजण देत आहेत. अनेकजण अल्लू अर्जुनच्या अभिनयाला फायर नाहीतर, वाईल्ड फायर असं म्हणत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? 'पुष्पा 2: द रुल' चे ओटीटी राईट्स निर्मात्यांनी आधीच विकले असून खूप मोठ्या किमतीला हा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. जाणून घेऊयात, 'पुष्पा 2: द रुल' चे राईट्स कुणी, किती रुपयांना विकत घेतले त्याबाबत...
कोणत्या प्लॅटफॉर्मने 'पुष्पा 2 द रुल' चे OTT राईट्स विकत घेतले?
Filmibeat च्या अहवालानुसार, OTT दिग्गज Netflix India नं सर्व भाषांसाठी 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राईट्स विकत घेतले आहेत. पुष्पा 2 चे राईट्स 270 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन नेटफ्लिक्स इंडियानं विकत घेतल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram
'पुष्पा 2: द रुल'ची स्टार कास्ट
'पुष्पा 2: द रुल'चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. त्यांनीच या चित्रपटाचं पटकथा लेखन केलं आहे. या चित्रपटाचं को-रायटिंग श्रीकांत विसा यांनी केलं आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स बॅनरचे नवीन येरनेनी आणि यलमांचिली रविशंकर निर्मित, या चित्रपटाचं एडिटिंग कार्तिक श्रीनिवास आणि रुबेन यांनी केलं आहे. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुननं पुष्पराजच्या भूमिकेत, रश्मिका मंदानानं श्रीवल्लीच्या भूमिकेत आणि फहद फासिलनं भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेत पुनरागमन केलं आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयानं लोकांना वेड लावलं आहे. त्यामुळे रश्मिका आणि फहाद यांनीही शोची लाईमलाईट चोरली आहे.
अल्लू अर्जुननं घेतलेत 300 कोटी
सर्वात आधी अल्लू अर्जुन या चित्रपटाचा लीड आहे. अल्लू अर्जुन संपूर्ण चित्रपटाच्या, कथेच्या केंद्रस्थानी आहे. अल्लू अर्जुननं संपूर्ण चित्रपटासाठी जेवढी मोठ्ठी रक्कम घेतली आहे की, तितकी कमाई अनेक बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करण्यासाठी कित्येक आठवडे घेतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याच्या फीबद्दल मीडियामध्ये चर्चा आहे की, अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2: द रुल'साठी केवळ 25-50 कोटी रुपये नव्हे, तर 300 कोटी रुपये इतकी मोठी फी घेतली आहे. यासह तो भारतातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे.