Pushpa 2 BO Collection In Hindi Day 14: 'पुष्पा 2'नं 14 व्या दिवशी इतिहास रचला; 600 कोटींचा टप्पा ओलांडला, आजवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटानं 14 व्या दिवशी इतिहास रचला आहे. स्त्री 2 चा विक्रम मोडून हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 14 In Hindi: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि यासोबतच तो वेगानं कमाई करत आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यात 'पुष्पा 2' नं खळबळ माजवली आहे. या चित्रपटानं हिंदी भाषेतही चांगली कमाई केली आहे. 'पुष्पा 2' (Pushpa 2) नं रिलीजच्या 14व्या दिवशी किती कलेक्शन केलं आहे, ते जाणून घेऊया सविस्तर...
'पुष्पा 2' नं 14 व्या दिवशी किती कोटींची कमाई?
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, हा पॅन इंडिया चित्रपट इतर भाषांच्या तुलनेत हिंदी भाषेत उत्तम कामगिरी करत आहे. रिलीजला दोन आठवडे पूर्ण होऊनही त्याची क्रेझ कमी होत नाही, सुट्टी नसलेल्या काळातही तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आले होते.
हिंदी भाषेतील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, 'पुष्पा 2' नं पहिल्या आठवड्यात केवळ हिंदीमध्ये 425.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर चित्रपटानं दुसऱ्या शुक्रवारी 27 कोटी, दुसऱ्या शनिवारी 46 कोटी, दुसऱ्या रविवारी 54 कोटी, दुसऱ्या सोमवारी 20.5 कोटी आणि दुसऱ्या मंगळवारी 18.5 कोटींचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे रिलीजच्या 14 व्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या बुधवारी आले आहेत.
Thank you India 🇮🇳 #TeamAA #Pushpa2 pic.twitter.com/4r30mWOCYS
— Allu Arjun (@alluarjun) December 12, 2024
सॅकनील्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' नं हिंदी भाषेत चौदाव्या दिवशी 16.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
यासह, 'पुष्पा 2'चं हिंदी भाषेतील 14 दिवसांचं एकूण कलेक्शन 607.35 कोटी रुपये झालं आहे.
त्याच वेळी, 'पुष्पा 2' ची सर्व भाषांमध्ये 14 दिवसांची एकूण कमाई 973.2 कोटी रुपये झाली आहे.
'पुष्पा 2' नं 14व्या दिवशी 'स्त्री 2' चा विक्रम मोडला
'पुष्पा 2' नं 14 व्या दिवशी एक नाही तर दोन मोठे विक्रम नावावर केले आहेत. जिथे हा चित्रपट 14व्या दिवशी 16.25 कोटींच्या कमाईसह हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर 'पुष्पा 2' नं भारतातील 'स्त्री 2' च्या लाईफ टाईम कलेक्शनला 14 व्या दिवशी 597.99 कोटी रुपयांनी मागे टाकलं आहे आणि 14 दिवसांत 607.35 कोटी रुपयांची कमाई करून हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. एवढंच नाहीतर 'पुष्पा 2' सर्वात वेगानं 600 कोटींचा आकडा पार करणारा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 700 कोटींच्या दिशेनं पुढे जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लष्कराची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं; जाणून घ्या, एका अपघातामुळं कसं आयुष्य पालटलं?