Allu Arjun Bail : झुकेगा नही साला! न्यायालयीन कोठडी मिळताच तासाभरात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर
Allu Arjun Case : हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun Case) तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुनला सेशन कोर्टने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे. हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी चेंगराचेंगरी (Hyderabad Sandhya Theatre Stampede Case ) होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
Allu Arjun Bail : तासाभरात जामीन मंजूर
अल्लू अर्जुनला हैद्राबाद चेंगराचेंगरी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तासाभरातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
अल्लू अर्जुनवर आरोप काय?
पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
ही बातमी वाचा: