एक्स्प्लोर

Punha Kartavya Aahe Serial Track : वसुंधरा, तनयाला गुरुमातेकडून जलसमाधीची शिक्षा; शिक्षा ऐकून तनया नवा कट रचणार?

Punha Kartavya Aahe Serial Track : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत गुरुमाता ठाकूरांच्या घरी येते आणि संपूर्ण कुटुंब तिचं मोठ्या जल्लोषात स्वागत करतं.

Punha Kartavya Aahe Serial Track : झी मराठीवरच्या (Zee Marathi) गाजलेल्या 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) मालिका आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि  ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी 'गुरुमा' म्हणून मालिकेत एन्ट्री घेतली आहे. गुरुमांच्या एन्ट्रीनं घरातल्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. 

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत गुरुमाता ठाकूरांच्या घरी येते आणि संपूर्ण कुटुंब तिचं मोठ्या जल्लोषात स्वागत करतं. ती जयश्रीला पाणी आणायला सांगते, पण पाणी चाखल्यानंतर ते अशुद्ध असल्याचं जाहीर करून ग्लास फेकून देते. पुढे गुरुमाता जयश्रीला प्रश्न विचारत तिला चौकशीच्या फेऱ्यात अडकवते. गुरुमाता वसुंधराला बोलावून तिला रोजच्या दिनचर्येबद्दल समजावतात. वसुंधरा लवकर उठून गुरुमातेनं सांगितलेले सर्व विधी पाळण्याचं वचन देते. गुरुमाता तिला इशारा करते की जर चुक झाली, तर त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तनया हे संभाषण गुपचूप ऐकते. 

वसुंधरा आपली दिनचर्या सुरू करते, तर तनया तिच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. मात्र, गुरुमाता योग्य वेळी येऊन वसुंधराला थांबवते. गुरुमाता वसुंधराचा नैवेद्य स्वीकारते आणि तिच्या तयारीचं कौतुक करते. अनपेक्षितपणे जयश्रीही वसुंधराचं कौतुक करते. यावर गुरुमाता म्हणतात, एकदा चांगलं काम केल्यावर त्यात रोज सातत्य राखलं जाईल याची खात्री देता येत नाही. इकडे वसुंधराला ताप आलाय आणि आकाश तिची रात्रभर काळजी घेतो. वसुंधरा सकाळी उठल्यानंतर तिला कळतं की, ती आपल्या कर्तव्यात चुकली आहे आणि ती गुरुमातेकडे माफी मागण्यासाठी जाते. वसुंधरा स्वयंपाक करत असताना आकाश तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो. तनया संधी साधून वसुंधराच्या डिशमध्ये लसूण पेस्ट घालते. इकडे शिष्य गुरु मातेला जेवण वाढतात, पण  तेवढ्यात त्यांच्या जेवणाला लसणाचा वास येतो. लसणाचा वास लागताच गुरु माता संतापते. तनया खोटं बोलून वसुंधरावर लसूण घालण्याचा आरोप करते. आता गुरुमाता दोन्ही सुनांना कठोर शिक्षा देणार आहे. त्यांना जलसमाधी घ्यावी लागणार आहे.
  
ही शिक्षा ऐकून तनया आणखी काही नवा कट रचेल? गुरुमातेच्या दिलेल्या शिक्षेवर कोणती सून खरी उतरेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे 'पुन्हा कर्तव्य आहे'चा नवा भाग पाहायला विसरू नका. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Embed widget