एक्स्प्लोर

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: 'केतनला मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती...'; पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची पोस्ट

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक यानं आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट केलीय.

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: पुण्यातील (Pune News) बड्या व्यावसायिक कुटुंबाचा उच्चशिक्षित लेक केतन अग्रवालचा (Ketan Agrawal) पुण्याच्या (Pune Crime) लोहगड (Lohagad) किल्ल्यावरुन पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली. पण, त्यानंतर जे समोर आलं ते मात्र अख्खा देश हादरवणारं होतं. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात हादरवणारं सत्य समोर आलं. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला 'मर्डर प्लॅन' असल्याचं निष्पन्न झालंय. तसेच, केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) हिला आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या. अशातच आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Bollywood Singer Amaal Mallik) यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन घटनेवर संताप व्यक्त केलाय. तसेच, नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते, असं म्हटलंय. 

प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Amaal Mallik) यानं आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट केलीय. अमालनं लिहिलंय की, फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो, कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? तसेच, पुढे बोलताना अमालनं सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना राक्षस म्हणून संबोधलं आहे. तसेच, अमालनं आपल्या ट्वीटमधून इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? असा प्रश्नही उपस्थित केलाय.

गायक अमाल मलिक नेमकं काय म्हणाला? 

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अमाल मलिक यानं सोशल मीडियावर पोस्ट केलीय. पोस्टमध्ये अमाल मलिकनं म्हटलंय की, "केतनला जीवे मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एकदा नाही म्हणाली असती तरी पुरे झालं असतं. दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे, हे सांगितलं पाहिजं होतं. हे सांगून पण त्यानं ऐकलं नाही आणि तो मागेच लागला असता तर त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगायचं होतं. कुटुंबाला यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजं होतं. या जगात कुठेही एका स्वतंत्र, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही..."

फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो : अमाल मलिक

"भारतातील कायदे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी चांगले आहेत, पण व्यवस्थेचा गैरवापर आणि हेराफेरी का करायची? फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो. कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? एक जीव गेला, कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस...", असं अमाल मलिकनं म्हटलंय.

नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते : अमाल मलिक

गायक अमाल मलिक यानं आणखी एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलंय की, "वर्षानुवर्षे महिलांवर पुरुषांमुळे खूप अत्याचार झाले आहेत आणि त्यांनी खूप सहन केलंय. त्यासाठी मी सर्व महिलांची माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. अत्याचाराविरोधात लढा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण हा लढा फक्त नीच लोकांसाठी मर्यादित ठेवा. जे लोक स्त्रियांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात आणि त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवतात, अशा लोकांविरोधात आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणारे लोकही तितकेच घातक असतात. पण, प्रत्येक गोष्टीला 'टॉक्सिक' असं नाव दिल्यामुळेच खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. नात्यांमध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते. भावनांपेक्षा पैशांना अधिक महत्त्व देणंही टॉक्सिक आहे. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं टॉक्सिक आहे. तसंच ज्याच्यासह आयुष्यभर राहण्याचा कोणताही हेतू नाही, अशा व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणे हे देखील तितकंच टॉक्सिक आहे..."

इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? : अमाल मलिक

पुढे अमालनं लिहिलंय की, "तुम्हाला वाटतं का पुरुषांना शांततेशिवाय दुसरं काही हवं असतं? शारीरिक संबंध तर सगळीकडे सहज उपलब्ध आहेत. पण, तुमच्या गरजा आणि इच्छांची मोठी यादी असते, विशेषतः जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा खूप अपेक्षा ठेवल्या जातात. इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? तुम्ही लोणावळ्यातील एका सुंदर हनिमूनमध्येही आनंदी राहू शकता, पण तुम्हाला खरं प्रेम असेल तर तो परदेशामध्ये घेऊन जाईल असं वाटतं... आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य पाहिजे असतं हे समजू शकतो, पण फक्त मालदीवमध्ये खऱ्या प्रेमाची भावना वेगळी असते का? या माणसाबरोबर जे झालं आहे, ते नव्हतं व्हायला पाहिजे. त्याचं हसणं आणि त्याचे डोळे बघा… तिच्याशी लग्न करण्यासाठी तो किती आनंदी होता ते बघा. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketan Agarwal Case: 'केतन अग्रवालसोबत असंच व्हायला हवं होतं... सियाला जामीन द्या'; महिलेच्या वक्तव्यांनी सारेच हैराण, नेटकरी म्हणाले, 'खरोखरंच दृष्ट...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget