एक्स्प्लोर

Raudra : ‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’, ‘रौद्र’ चित्रपटासाठी प्रमोशनचा हटके फंडा!

Raudra Marathi Movie : ‘रौद्र’ या मराठी चित्रपटासाठी ‘ट्रेझर हंट’ अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अल्ट्रा मराठीच्या एफबी आणि इन्स्टा पेजवर ही स्पर्धा सुरु आहे.

Raudra Marathi Movie : एखाद्या नवीन चित्रपटाविषयी आपल्या मनात उत्सुकता कशी निर्माण होते?  त्याच कारण म्हणजे चित्रपटांचं प्रमोशन.. या न त्या रुपाने आपल्यासमोर सतत त्या चित्रपटाविषयी काही ना काही येत असल्याकारणाने देखील आपल्या मनात त्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते. सध्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ट्रेलर लाँच, कलाकारांच्या मुलाखती या पद्धतीने तर प्रमोशन केलंच जातं. मात्र, चित्रपटाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्पर्धा घेत चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

एम.जी पिक्चर्स निर्मित अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनी प्रस्तुत ‘रौद्र’ या मराठी चित्रपटासाठी ‘ट्रेझर हंट’ अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अल्ट्रा मराठीच्या एफबी आणि इन्स्टा पेजवर ही स्पर्धा सुरु आहे. ‘रौद्र’ हा रहस्यभेदावर आधारित चित्रपट असल्याने वेगवेगळी कोडी प्रेक्षकांसाठी देण्यात आली आहेत. या कोडयांची अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याच्या संधीसोबत अल्ट्रा मराठीवर झळकण्याची संधी मिळणार आहे. रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित ‘रौद्र’ हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘रौद्र’ या मराठी चित्रपटाची कथा रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीच रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला नायक एका बखरीत असलेल्या वेगवेगळया कोडयांमार्फत रहस्याचा शोध घेत असतो. ही कोडी तो कशाप्रकारे उलगडणार? या कोडयातून त्याला काही गवसणार? की तो कोणत्या चक्रात अडकणार ? याची  रंजक पण थरारक कथा म्हणजे ‘रौद्र’ हा चित्रपट. चित्रपटाच्या याच पार्श्वभूमीवर ‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’ ही स्पर्धा चालवली असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय.

नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी ‘रौद्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून, पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget