अभिनेत्री प्रियांका चोप्रा 6 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार, कोणासोबत झळकणार?
Priyanka Chopra Bollywood Comeback : प्रियांका चोप्रा बद्दल एक मोठी बातमी समोर आलीये. त्यानुसार ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. जाणून घ्या ती कोणत्या चित्रपटात दिसणार आहे.

Priyanka Chopra Bollywood Comeback : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा हिनने आता हॉलिवूडमध्येही स्वत:ची दमदार ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाण्यापूर्वी बॉलिवूड चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ मध्ये दिसली होती. आता बातमी समोर येत आहे की प्रियंका 6 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपल्या अभिनयाचं जादू दाखवणार आहे.
‘लव्ह अॅन्ड वॉर’मध्ये दिसणार प्रियंका चोप्रा?
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्रा संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अॅन्ड वॉर’ या चित्रपटात झळकू शकते. या चित्रपटात तिचा एक डान्स नंबर असणार आहे. मात्र याबाबत अद्याप प्रियंका किंवा मेकर्सकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांसारख्या मोठ्या कलाकारांसह बनणार असून, चाहत्यांना या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रियांका चोप्राचा डान्स नंबर असेल
याआधी प्रियांकाने भन्साळींच्या ‘राम-लीला’ या चित्रपटात ‘राम चाहे लीला’ या गाण्यावर आपल्या जबरदस्त स्टेप्सने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. हे गाणं खूप मोठं हिट ठरलं होतं आणि आजही प्रेक्षक ते गाणं आवडीने ऐकतात. अशात जर ती पुन्हा भन्साळींच्या चित्रपटात डान्स करताना दिसली, तर ते प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. मात्र या बातमीत किती तथ्य आहे, हे मेकर्सच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
प्रियंका सध्या पतीसोबत परदेशात राहते
View this post on Instagram
प्रियंका चोप्रा 2015 साली अमेरिकेत स्थलांतरित झाली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये केवळ दोन चित्रपट केले. शेवटची ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती, जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला. प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगी आहे, तिचं नाव त्यांनी मालती मेरी जोनस असं ठेवलं आहे. प्रियंका आणि निक अनेकदा आपल्या मुलीसोबतचे गोड फोटो आणि व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























