एक्स्प्लोर

Priyanka Chopra Baby Name : प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा...

Madhu Chopra : प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी बाळाच्या नावाबाबत खुलासा केला आहे.

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी बाळाच्या नावाबाबत खुलासा केला आहे.

एका मीडिया इव्हेंटमध्ये मधु चोप्रा यांनी आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मीडियाशी बोलताना मधु चोप्रा म्हणाल्या की, 'मी आजी झाल्यावर खूप आनंदी झाले आहे. मी सतत हसत राहते. मी खूप आनंदी आहे.'

बाळाचे नाव काय?

यावेळी प्रियांका आणि निक जोनास यांच्या मुलाच्या नावाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप मुलाचे नाव ठेवलेले नाही. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, 'अजून नाव ठेवलेले नाही. पंडित नाव सुचवेल, तेव्हा बारसं होईल.'

सरोगेसीद्वारे बाळाचे स्वागत!

प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले की, ‘आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत, हे कळवताना खूप आनंद होत आहे. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो. कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!'

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Embed widget