Amir Khan : 2 मिनिटांसाठी 7 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, आमिरच्या 'त्या' लूकचा 'तारे जमीन पर'च्या ईशाननेच केला खुलासा
Amir Khan New Look : आमिर खानच्या नव्या लूकविषयी जोरदार चर्चा होती. पण आता त्याच्या या नव्या लूकचं उत्तर चाहत्यांना मिळालं आहे.
Amir Khan New Look : काही दिवसांपासून आमिर खानच्या (Amir Khan) एका लूकची बरीच चर्चा होती. आता या लूकविषयी खुलासा करण्यात आला आहे. आमिरचा हा लूक त्याच्या एका जाहिरातीसाठी होता. इतकच नव्हे तर त्याने 2 मिनिटांच्या या जाहिरातीसाठी एकूण सात लूक केले आहेत. या लूकमधील त्याच्या परफेक्शनचं सध्या कौतुक होतंय. तसेच चित्रपटांसारखा लूक आमिरने जाहिरातींमध्ये साकारला असल्याचं देखील अनेकांनी म्हटलंय.
‘तारे जमीन पर’ फेम अभिनेता दर्शील सफारीने तीन दिवसांपूर्वी आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना दर्शिलने तो 16 वर्षांनंतर आमिरसोबत दिसणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी त्याने त्यांच्या या नव्या जाहिरातीविषयी काहीही माहिती दिली नव्हती. तेव्हापासून आमिरच्या या लूकची चर्चा होती.
आमिरच्या लूकची चर्चा
दर्शीलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तो आमिरसह एका एनर्जी ड्रींकच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार असल्याचं त्यानं सांगितलं. या जाहिरातमधील आमिरच्या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय. हा व्हिडिओ शेअर करताना दर्शीलने म्हटलं की, आमिर खान एका एडवेंचर जर्नीसाठी जातोय. त्याच्यासोबत तुम्हीही सामील व्हा. तसेच या व्हिडिओमध्ये आमिर दर्शीलच्या आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 2 मिनिटांच्या या जाहिरातीत त्याने 7 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
सोशल मीडियावर आमिरच्या लूकची चर्चा
आमिर खानची ही नवी जाहिरात पाहून त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. एका फॅनने कमेंट करत म्हटलं की, 'फक्त आमिर एका जाहिरातीतही चित्रपटासारखी परफेक्शन आणू शकतो.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'आमिरच्या जाहिराती आमच्यासाठी नेहमीच शॉर्ट फिल्म्ससारख्या असतात.'
View this post on Instagram
दर्शीलच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा दर्शील आणि आमिर नव्या चित्रपटात एकत्र दिसरणार असल्याच्या चर्चा होत्या. पण असं काहीही झालं नाही. आमिर सध्या त्याच्या सितारे जमिन पर या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दीड वर्षांच्या ब्रेकनंतर आमिर 'सीतारे जमीन पर'मधून त्याचं कमबॅक करणार आहे.