एक्स्प्लोर

Priyadarshan Talks About Hera Pheri 3 Controversy: 'हेरा फेरी 3' वादानंतर परेश रावलवर टाकण्यात आलेला दबाव; दिग्दर्शकाचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, 'तो घाबरलाय...'

Priyadarshan Talks About Hera Pheri 3 Controversy: दिग्दर्शक प्रियदर्शन हे अनेक जेन-झी मुलांचे आवडते चित्रपट निर्माते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता ते 'हेरा फेरी 3' घेऊन येत आहेत.

Priyadarshan Talks About Hera Pheri 3 Controversy: बॉलिवूडमधील (Bollywood News) लोकप्रिय सिनेमा फ्रँचायझी 'हेरा फेरी'चा (Hera Pheri) सिक्वेल असलेल्या 'हेरा फेरी 3'ची (Hera Pheri 3) प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांत हा चित्रपट बराच वादग्रस्त ठरला आहे. याचं कारण सांगायचं झालं तर, परेश रावल (Paresh Rawal) म्हणता येईल. त्यांनी म्हटलं की, 'हेरा फेरी' मधल्या बाबुरावची भूमिका गळ्यातल्या फासासारखी वाटू लागली आहे. त्यानंतर त्यांनी या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खूप नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुन्हा परेश रावल यांची 'हेरा फेरी 3'मध्ये वापसी झाली. त्यावर त्यांनी स्वतःही प्रतिक्रिया दिलेली. अशातच आता, सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते प्रियदर्शन (Producer Priyadarshan) यांनी मौन सोडलं आहे. 

दिग्दर्शक प्रियदर्शन हे अनेक जेन-झी मुलांचे आवडते चित्रपट निर्माते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'हंगामा', 'हेरा फेरी', 'गरम मसाला', 'भूल भुलैया' आणि 'दे दना दन' यांसारखे त्यांचे चित्रपट प्रचंड मनोरंजन करत होते. दरम्यान, या चित्रपटांनंतर त्यांनी बराच काळ ब्रेक घेतला. आता, प्रियदर्शन सलग तीन चित्रपटांसह हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहेत.

परेश रावल यांच्याबाबत काय म्हणाले प्रियदर्शन? 

अलिकडेच प्रियदर्शन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. दिग्दर्शकानं 'हेरा फेरी 3'बाबतच्या वादांवरही आपले विचार मांडले. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांना विचारण्यात आलं की, 'हेरा फेरी 3'बाबतच्या वादाचा परेश रावल यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्यावर परिणाम झाला का? यावर बोलताना प्रियदर्शन म्हणाले की, "परेश आणि माझ्या मैत्रित कोणताही त्रास झाला नाही. माझ्या माहितीनुसार, अक्षय आणि परेश यांच्यातही कोणताही राग, रुसवा नाही..."

"परेशवर दबाव आणणाऱ्या इतर शक्ती आहेत, नकारात्मक शक्ती आहेत आणि परेश हा असा व्यक्ती आहे, जो तुम्हाला माहिती आहे की, मी आजारी आहे याची भीती बाळगतो आणि त्याबद्दल खूप चिडतो, पण त्याला इतर समस्या आहेत. म्हणून तो घाबरतो, पण त्याच वेळी, त्याचा आमच्या नात्यावर कधीही परिणाम झालेला नाही...", असं प्रियदर्शननं सांगितलं. 

प्रियदर्शन पुढे बोलताना म्हणाला की, "अक्षयनं मला सांगितलं, 'प्रियन सर, जर असं घडत असेल तर ते होऊ द्या... नाहीतर, हे विसरणंच योग्य. बस्स... जर काही घडलं तर ते चांगल्या पद्धतीनं घडू द्या... इतर वाईट शक्ती आहेत ज्यांनी अनेक समस्या निर्माण केल्या. त्यांच्याबद्दल बोलणं निरर्थक आहे, म्हणून मी बोलणार नाही... आपण फक्त आयुष्यात सर्वोत्तम गोष्टींची आशा करूयात... ही चित्रपट निर्मिती आहे. या जगात, तुमचे शत्रू, मित्र, चाहते, समीक्षक आणि असं बरंच काही आहे... मला अजूनही माहीत नाही की, मी या उद्योगात 40 वर्ष कसा टिकून राहू शकलो..."

परेश रावल यांनी अचानक घेतलेली 'हेरा फेरी 3'मधून एग्झिट

परेश रावल यांनी मे 2025 मध्ये अचानक 'हेरा फेरी 3'मधून एग्झिट घेतलेली. त्यांच्या या निर्णयामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार नाराज झालेले. अक्षयनं अभिनेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्याच्या बातम्याही समोर आलेल्या. दोन्ही अभिनेत्यांमधील हा वाद बराच काळ सुरू राहिला, पण अखेर वाद निवळला आणि परेश रावल यांची 'हेरा फेरी 3'मध्ये वापसी झाली.

दरम्यान, प्रियदर्शनबद्दल बोलायचं झालं तर, दिग्दर्शक एप्रिल 2026 मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत 'भूत बंगला' हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. या काळात ते 'हेरा फेरी 3'चं चित्रीकरण देखील करणार आहेत. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, ते अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत 'हैवान' सिनेमाही करणार आहेत, जो पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget