(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priya Bapat : मराठी अभिनेत्रीने मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायलाही टाकलं मागे, प्रिया बापट IMDbच्या यादीत दुसऱ्या स्थानावर
Priya Bapat : प्रिया बापट हिने ऐश्वर्या रायला मागे सारत IMDbच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.
Priya Bapat : या आठवड्यात, प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज 'रात जवान है’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तिची ही नवी सीरिज तीन चांगल्या मित्रांच्या कथेवर आधारित आहे. दरम्यान आयएमडीबीच्या यादीत प्रिया बापटनंतर (Priya Bapat) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), करीना कपूर (Kareena Kapoor), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, 'तुम्बाड' पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये परत आणत नायक सोहम शाहने या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मसेने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर36’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत 9वे स्थान मिळविले आहे. त्याचा सहकलाकार दीपक डोबरियाल 37व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ साठी 8व्या स्थानावर आहे. तिचा सहकलाकार राजकुमार राव 21व्या स्थानावर आहे.
ही माझ्या कामाची पावती - प्रिया बापट
प्रिया बापट हिने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली हि एक पावती आहे.'
पुढे तिने म्हटलं की, 'माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी असलेल्या माझ्या रिलीजेस साठी मी खूप उत्सुक आहे. हे सर्व रिलीजेस खूपच छान आहेत आणि त्यावर देखील प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे.'
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Thunderbolts : 'थंडरबोल्ट्स'चा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा येणार भेटीला