एक्स्प्लोर

Pravin Tarde On Deool Band 2: 100 कोटी कमावले; 'देऊळ बंद 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले; एवढं कलेक्शन झालं कसं? प्रवीण तरडेंनी सगळीच गुपितं बाहेर काढली, म्हणाले..

'देऊळ बंद 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षाही अधिक कलेक्शन करत मराठी मनोरंजन सृष्टीत एक नवा विक्रम केलाय.

Pravin Tarde on Deool Band 2: यंदाचे वर्ष मराठी चित्रपटांसाठी प्रचंड यशस्वी ठरताना दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपटानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाला देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 'देऊळ बंद 2' चित्रपटाने जगभरात 100 कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय. अजूनही हा चित्रपट बघायला लोक आवर्जून जात आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे  वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत 100 कोटी कमवण्याचं सीक्रेट त्यांनी सांगून टाकलंय. 

'देऊळ बंद 2'ने 100 कोटी कसे कमावले ?

श्रद्धा, शेतकऱ्यांवर आलेलं संकट आणि स्वामी समर्थांचं तत्वज्ञान यांची सांगड असणाऱ्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाला महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद मिळाला. अगदी ग्रामीण भागापासून ते परदेशातही या चित्रपटाने दमदार कमाई केली. 'देऊळ बंद 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षाही अधिक कलेक्शन करत मराठी मनोरंजन सृष्टीत एक नवा विक्रम केलाय. दरम्यान, एका मुलाखतीत 100 कोटी कमावण्याचं गुपित दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं. ते म्हणाले 'सिनेमाला 100 कोटी कमावण्याचा सगळ्यात मोठं गुपित काय आहे माहितीय का? ते म्हणजे नवीन आयडिया. आम्ही निर्मात्यांसोबत बसून नवीन आयडिया केल्या.फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून राहायचं नाही ही आयडिया आम्ही केली.हे शंभर कोटींच्या मागचा सगळ्यात मोठं कारण आहे.थिएटर मधून पैसा येतो पण आम्ही त्यासोबत तंबू थिएटर चालवले.' 'विषयच भारी' या यूट्यूब चॅनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

'..नाहीतर 'देऊळ बंद 2'  तिथेच थांबला असता'

ते पुढे म्हणाले ' 'देऊळ बंद 2 ' सिनेमा क्षमतेनुसार बॉक्स ऑफिसवर 88 ते 90 कोटींवरच थांबला असता. ज्या भागात थिएटर नाही, तिथे स्वामींच्या सेवा केंद्रात जाऊन आम्ही 25 - 30 - 40 कृपया था सिनेमा दाखवला.मग तंबू थिएटरमध्ये शो केले. तंबू शो मधून 4:15 कोटींचं कलेक्शन आम्ही केलं.परदेशात शो हाऊसफुल झाला तर एका शोचं कलेक्शन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जातं.त्यामुळे अमेरिकेत आम्ही 54 ते 55 शो केले . जर्मनी कॅनडा, जपान, सिंगापूर, नेदरलँड, दुबईमध्ये शो केले. परदेशात पावणेआठ कोटींचं कलेक्शन झालं. सांगायचं तात्पर्य म्हणजे फक्त बॉक्स ऑफिसवर अवलंबून न राहता आम्ही वेगळ्या वाटा निवडल्या. दोन वर्ष सिनेमासाठी दिली आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 50 दिवस मी घरात थांबलो नाही.मी रोज प्रत्येक थिएटरमध्ये गेलो . कसलाच कॉश्च्यूम डिझायनर, मेकअप हेअर स्टायलिस्ट नाही.माझा मोबाईल आणि मी.असं एकही थिएटर नाही, जिथे मी गेलो नाही.उन्हातानात पावसात फिरलो.मुंबईत रात्रीचे शोही हाउसफुल व्हायचे.प्रत्येक प्रेक्षकाला मी फोटो दिलाय.मी स्वतःहून हे सगळं केलं.हे शंभर कोटी अचानक आलेले नाहीत.असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget