एक्स्प्लोर

Pravin Tarde : 'मतदानाच्या गर्दीनेच पुण्याचा निकाल स्पष्ट केलाय', मोहोळांची सभा गाजवल्यानंतर मतदानादिवशीच प्रवीण तरडेंनी वर्तवला निकालाचा अंदाज

Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया देखील दिली आहे. 

Pravin Tarde :  अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी आज पुण्यात त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Lok Sabha Election) मतदानाच्या प्रक्रियेतील चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये पुणे शिरुर, जळगांव,जालना यांसह 11 मतदारसंघांचा समावेश होता. पुण्यात अनेक कलाकार मंडळींनी देखील मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील सपत्नीक मतदान केलं. यावेळी त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना प्रतिक्रिया देखील दिली. 

प्रवीण तरडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या सभेतही भाषण केलं होतं. या सभेतील त्यांचं भाषणही तुफान गाजलं. मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हात जोडून विनंती की मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर न्यायचा आहे, असं त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर आता मतदानानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनेही साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 

पुणेकरांना माहितेय देशाला कुणाची गरज - प्रवीण तरडे

प्रवीण तरडेंनी यावेळी एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, 'जल्लोषचं वातावरण आहे. बहुतेक पुणेकरांना कळालं आहे की देशाला गरज कुणाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. मतदानाला आलेल्या गर्दीनेच पुण्याचा निकाल स्पष्ट केलाय. महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण मोठ्या प्रमाणात होतोय, यावर प्रवीण तरडेंनी म्हटलं की, 'हे आरोप वैगरे याला काही अर्थ नाही, कारण पुणेकर असं काही मानतच नाहीत. ती राजकीय माणसं आहेत, तो त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ती लोकं ते करणारच.' 

पुण्यात किती टक्के मतदान

राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. त्यात पुणे,शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातीलदेखील मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदानाला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5  वाजेपर्यंत 43.89 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  सकाळच्या सुमारास पुणेकरांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पुणेकरांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर दुपारीदेखी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.                             

ही बातमी वाचा : 

Adinath Kothare : आदिनाथ कोठारेचा वाढदिवस, पण चाहत्यांना उत्सुकता उर्मिलाच्या पोस्टची 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India in India : टीम इंडिया ITC मौर्यामध्ये दाखल, हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दीABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 04 July 2024 Marathi NewsTeam India in Delhi : Virat Kohli, Suryakumar Yadav ची दिल्ली विमानतळावर पहिली झलक | T20 World CupHeadlines ABP Majha : 07 PM Headlines ABP Majha 04 July 2024 Marathi News ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Marathi Serial Updates Tharal Tar Mag!  : 'ठरलं तर मग!' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय
'ठरलं तर मग!' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Embed widget