एक्स्प्लोर

Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: 'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?

Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: दिग्दर्शक प्रवीण तरडेंची मुळशीतल्या लाटलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर सूचक पोस्ट. नेटकरी म्हणतायत, अरे ही तर 'मुळशी पॅटर्न 2'ची चर्चा.

Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: 2026 चं वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी (Marathi Film Industry) सुगीचं ठरलंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी सिनेसृष्टीत अनेक दमदार सिनेमे (Marathi Films) आले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कोट्यवधींची कमाई केली. मराठीतल्या 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) सर्वाधिक चर्चा असलेला सिनेमा म्हणजे, 'देऊळ बंद 2' (Deool Band 2). प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशातच 'देऊळ बंद 2'च्या मोठ्या यशानंतर आता 'मुळशी पॅटर्न'चा (Mulshi Pattern) सुद्धा सीक्वेल लवकर घेऊन या अशी गळ गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांकडून  प्रवीण तरडेंना घातली जात होती. प्रवीण तरडेंनीसुद्धा प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवत, 'मुळशी पॅटर्न 2'ची (Mulshi Pattern 2) अधिकृत घोषणा केलेली. त्यामुळे रसिक-प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली. अशातच आता प्रवीण तरडेंनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर केलेली एक पोस्ट भलतीच चर्चेत आहे. 

दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये प्रवीण तरडेंनी मुळशीतल्या लाटलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर भाष्य केलंय. यामध्ये त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नसलं तरीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे प्रेक्षकांना हीच मुळशी पॅटर्न 2'ची स्टोरी लाईन असल्याचं वाटतंय. अनेकांनी तर, "सर, 'मुळशी पॅटर्न 2'...", असं म्हणत त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची पोस्ट नेमकी काय? (Pravin Tarde Social Media Post On Mulshi Ring Road Land)

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी म्हटलंय की, "मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या 5 वर्षांत रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या... सगळ्यांचा हिशोब होणार.... मूळ मालक शेतकरीच!" 

प्रवीण तरडे यांनी मुळशीतल्या रिंग रोडवरच्या शेतजमिनीवरची पोस्ट शेअर करताना एक कॅप्शनही दिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय की, "आता मोठ मोठे अंगावर येतील... पण पर्याय नाही शेवटी मुळशीकर आहे... बोलावं तर लागणारच..."

दरम्यान, प्रीवण तरडे यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. तसेच, काही वेळातच या पोस्टचं कमेंट सेक्शन भरुन गेलं. त्यापैकी बऱ्याच जणांनी 'मुळशी पॅटर्न 2', अशा कमेंट्स करत प्रवीण तरडेंच्या आगामी सिनेमाबाबत उत्सुकता दर्शवली आहे. 

'मुळशी पॅटर्न 2'बाबत प्रवीण तरडेंची अधिकृत घोषणा (Pravin Tarde On Mulshi Pattern 2)

काही दिवसांपूर्वी 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत माहिती दिलेली. 'मुळशी पॅटर्न 2'बाबत बोलताना त्यांनी सांगितलेलं की, "देऊळ बंद 2'नंतर शक्यतो मी 'मुळशी पॅटर्न पार्ट 2'कडे वळेन. पहिल्या भागातून मी शेती विकायची नसते, ती जपायची असते हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता... 'मुळशी पॅटर्न 2'मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं?  याचं उत्तर सिनेमातून मिळेल..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget