Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: 'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...
Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: सुरुवातीला 'फुले' सिनेमावरुन गदारोळ झालेला, त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाला. पण, त्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. यावर आता प्रतीक गांधीनं मौन सोडलं आहे.

Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: भारतीय शेअर बाजारातल्या (Share Market) सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असलेल्या हर्षद मेहता (Harshad Mehta) घोटाळ्यावर आलेल्या 'स्कॅम 1992' सीरिजमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे, प्रतीक गांधी (Pratik Gandhi). 'इश्क है तो रिस्क है...', सीरिजमधला हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. 'स्कॅम 1992' सीरिज सुपरडुपर हिट ठरल्यानंतर प्रतीक गांधीनं अनेक सिनेमे केले. सध्या तो 'सारे जहां से अच्छा' (Sare Jahan Se Accha) या वेबसीरिजमुळे (Web Series) चर्चेत आहे. तर, त्यापूर्वी त्यानं 'फुले' सिनेमा (Phule Movie) केला होता. या सिनेमात प्रतीक गांधी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दिसला होता.
सुरुवातीला 'फुले' सिनेमावरुन गदारोळ झालेला, त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाला. पण, त्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर, 'स्कॅम 1992'नंतर प्रीतकच्या एकाही सिनेमाला फारसं यश मिळालं नाही. यावर आता स्वतः प्रतीक गांधीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रतीक गांधीनं 'फुले' सिनेमाच्या अपयशावर मौन सोडलं आहे. आम्ही जितकी अपेक्षा केली होती तितका सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही, असं प्रतीक गांधी म्हणाला आहे. तसेच, पुढे बोलताना तो म्हणाला की, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हाच विचार करतो की हा प्रोजेक्ट माझ्यासाठी योग्य आहे. मग मी त्या भूमिकेसाठी पूर्ण न्याय देतो.
प्रतीक गांधी नेमकं काय म्हणाला?
अभिनेता प्रतीक गांधी बोलताना म्हणाला की, "हो, कधी कधी दु:ख नक्कीच होतं. विशेषत: फुले सारख्या सिनेमाकडून खूप अपेक्षा असतात. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा होती. प्रेक्षक सिनेमाचं कौतुक करतील असंही वाटत होतं. मात्र आम्ही जितकी अपेक्षा केली होती तितका सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तरी सुद्धा मी जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हाच विचार करतो की हा प्रोजेक्ट माझ्यासाठी योग्य आहे. मग मी त्या भूमिकेसाठी पूर्ण न्याय देतो. म्हणून मला माझंच समाधान वाटतं ना की, बाहेरुन मिळणाऱ्या प्रतिसादावर ते अवलंबून असतं."
"नक्कीच इंडस्ट्रीत अशी एक व्यवस्था हवी जेणेकरुन सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. इंडस्ट्रीत बऱ्याच सुधारणेची गरज आहे. टेक्नॉलॉजी तर आहे पण त्यासाठी प्रेक्षकांपर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. हळूहळू इंडस्ट्री त्या दिशेने जात आहे मात्र तरी आणखी सुधारणेची गरज आहे.", असं प्रतीक गांधी म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























