एक्स्प्लोर

Couple Laybhari : गावरान लव्हस्टोरी, 'नादखुळा म्युझिक'वर प्रशांत नाकतीचं 'कपल लयभारी' गाणं प्रदर्शित!

Couple Laybhari : प्रशांत नाकती निर्मित 'कपल लयभारी'(Couple Laybhari) गाणं रीलीज झालं आहे. अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल होत आहे.

Couple Laybhari : 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. नुकतंच 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित 'कपल लयभारी'(Couple Laybhari) गाणं रीलीज झालं आहे. अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल होत आहे.

याआधी प्रशांतची 'पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’, ‘आपलीच हवा’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी व्हायरल झाली होती. या गाण्यात प्रशांतने एक सोज्वळ गावरान लव्हस्टोरीचं चित्रण दाखवलं आहे. त्यामुळे ही वेगळी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘कपल लयभारी’ या गाण्याचे गीतकार प्रशांत नाकती आहे. या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती, संकेत माने आणि कुणाल-करण यांनी केलं आहे. तर, गायक ऋषभ साठे आणि गायिका सोनाली सोनावणे हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात अभिनेता विजय सोनावणे आणि अभिनेत्री हिंदवी पाटील हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'कपल लयभारी' गाण्याच्या रील्स व्हिडीओची चर्चा आहे.

‘आपलीच हवा’नंतर ‘कपल लयभारी’ची चर्चा!

'कपल लयभारी' या लव्ह सॉंगविषयी प्रशांत नाकती सांगतो, ‘आपलीच हवा’ या गाण्याच्या घवघवीत यशानंतर आम्ही एक गावरान लव्हस्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका गावातली मुलगी जी एका घरात मोलकरीण म्हणून काम करत असते आणि त्याच घरातला एक मुलगा जो परदेशी शिक्षणासाठी गेलेला असतो. तो आल्यानंतर त्याला लहानपणीच्या आठवणी काही आठवत नसतात. ती त्याला लहानपणीच्या आठवणींची जाणीव करून देते. असं हे प्रेमाचं संदेश देणारं गाणं आहे. मी आणि संकेतने पहिल्यांदाच संगीतकार कुणाल करणसोबत म्युझिकवर एकत्र काम केलं. अभिनेता विजय सोनावणे आणि अभिनेत्री हिंदवी पाटील ही जोडी या गाण्यादरम्यान पहिल्यांदाच नादखुळा म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत एकत्र काम करत आहे.’

शूटिंगचा किस्सा...

नाशिकमधील चित्रीकरणाविषयी गोड किस्सा सांगताना प्रशांत म्हणतो, ‘या गाण्याचं चित्रीकरण हे नाशिकमध्ये झालं. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी एक गोड किस्सा घडला. तिथे आऊट डोअर शूटिंग करताना बाजूच्या रस्त्याने एक शाळेची व्हॅन गेली. मुलांना कळलं की, इथे शुटींग सुरू आहे. शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्याने त्यांची बस जाणार होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बसचालकाला सांगून शुटींग पाहण्यासाठी 10 मिनीटं बस थांबवली आणि त्यानंतर त्यांनी प्रशांत नाकती, सोनाली सोनावणे, नीक शिंदे, विजय सोनावणे आणि हिंदवी पाटीलसोबत फोटो काढले. मोबाईलच्या जमान्यात त्या छोट्या मुलामुलींने त्यांच्या वहीवर सगळ्यांच्या सह्या देखील घेतल्या. त्या सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे करताना मजा आली.’

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maa Behen: बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
Subodh Bhave: परदेशातही कामाची धडपड! स्वित्झर्लंडमध्ये 'वीण दोघांतली ही तुटेना'चं शूटिंग, सुबोध भावेंचा VIDEO व्हायरल
परदेशातही कामाची धडपड! स्वित्झर्लंडमध्ये 'वीण दोघांतली ही तुटेना'चं शूटिंग, सुबोध भावेंचा VIDEO व्हायरल
Shilpa Shinde: हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन
हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार

व्हिडीओ

MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget