एक्स्प्लोर

Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा

Elvish Yadav on CJP protest: तरुणांवर झालेल्या लाटीचार्जवर एल्विश यादवने प्रतिक्रिय दिली आहे.

Elvish Yadav on CJP protest Shares Post: दिल्लीतील जंतर मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party)तील समर्थक आणि  आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाबाहेर घेराव घातला होता. आंदोलन होत असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आली होती (CJP protest).  लाठीचार्जमुळे तरुण वर्गाला नाहक वेदना सहन कराव्या लागल्या (LaathiCharge). तर, काही तरुण रक्तबंबाळ होऊन  खाली कोसळले.  या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे (Elvish Yadav).  सामान्य जनतेसह काही  सिनेकलाकारांनीही पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचा विरोध केला.  काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपला संताप व्यक्त केला. तसेच  एल्विश यादव याने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.   'विद्यार्थी (Entertainment) तुमच्याजवळ समस्या घेऊन आले होते. त्यांना मारण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते', असं म्हणत एल्विशने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तरुणांवर झालेल्या लाठीचार्जवर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत (Elvish Yadav CJP Protest)

सोमवारी, 20 मार्च रोजी 'कॉकरोज जनता पार्टी'चा संसद मोर्चा पार पडला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बरेच लोक 16 जुलैपासून जंतर मंतर येथे दाखल झाले होते. अनेक जणांनी संपूर्ण रात्र फुटपाथवर घालवली.   सकाळी जेव्हा आंदोलन सुरु झालं, तेव्हा  पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.    'इंकलाब जिंदाबाद'च्या घोषणा देण्यास सुरुवात झाली.  यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. 

काही रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. काहींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात  आलं.  दिवसभरातील घडामोडींचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. व्हिडीओ  पाहताच अनेकांनी संताप व्यक्त केला. काही सिने कलाकारांनी आंदोलनस्थळ गाठले. तसेच समर्थन दर्शवलं.  प्रकाश राज, शबाना आझमी, पुनम पांडे या कलाकारांनी जंतर मंतर येथे जाऊन तरुणांना प्रोत्साहन दिलं.  तसेच लाठीचार्जनंतर काही सिनेकलाकारांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. 

एल्विश यादवनेही तरुणांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याने अधिकृत एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ना मी बीजेपीचा समर्थक ना काँग्रेसचा समर्थ आहे. पण  विद्यार्थ्यांसोबत  जे घडतंय ते पू्र्णपणे चुकीचं आहे. आपल्या समस्या पुढे घेऊन आलेल्या  विद्यार्थ्यांवर  हिंसाचार होणं चुकीचं आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, हे जाणून घ्यायला हवं होतं.  तसेच योग्य कारवाई करणं गरजेचं आहे', असं एल्विश यादव म्हणाला. सध्या एल्विश यादवची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. 'सगळ्यात आधी तिथे NEETचा एक तरी विद्यार्थी उपस्थित होता का? हे सिद्ध करा', असं एकाने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
Embed widget