एक्स्प्लोर

Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकाविश्वात कमबॅक, 8 वर्षांनी स्टार प्रवाहच्या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: शाळा… हा शब्द उच्चारला की, डोळ्यांसमोर उभी राहतात ती फळ्यावरची अक्षरं, प्रार्थनेचे सूर, मधल्या सुट्टीतला गोंधळ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घडवणारे शिक्षक. आई-वडिलांनंतर जर कुणी निःस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी झटत असेल, त्यांच्या चुकांवर मायेने बोट ठेवत असेल, त्यांच्या यशात स्वतःचं सुख शोधत असेल, तर ते असतात शिक्षक. अशीच आपल्या शाळेवर आणि विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारी, मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी देणारी एक हाडाची शिक्षिका म्हणजेच नाईक बाई आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहेत.

नाईक बाईंसाठी शाळा म्हणजे चार भिंतींची इमारत नाही, तर ते एक कुटुंब आहे. शाळेची घंटा म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे त्यांचं समाधान. घर, संसार, जबाबदाऱ्या आणि आयुष्याने दिलेल्या अनेक परीक्षांचा समतोल साधत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवत राहतात. स्वतःच्या अडचणी कधीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न देता, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. स्वतःचं घर सांभाळतानाच शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या भूमिकेविषयी ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' (Amchya Ladkya Naik Bai) ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही, तर आपल्या आयुष्यात भेटलेल्या त्या प्रत्येक शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे, ज्या स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. नाईक बाईंचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम, प्रत्येक मुलामध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्याची त्यांची दृष्टी मला खूप भावली. आजही आपण सगळे आपल्या आयुष्यातील एखाद्या आवडत्या शिक्षकाला प्रेमाने आठवतो, तसंच नातं नाईक बाई आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे. ही भूमिका साकारताना अनेकदा मला माझ्या स्वतःच्या शिक्षकांची आठवण होते. माझ्यासाठी म्हणाल तर आईनंतर बाई अर्थात आमच्या शिक्षिकांना महत्त्वाचं स्थान होतं. तेव्हा तेव्हा त्यांनी शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. इतकं प्रेम त्यांनी दिलं की, सणाला आवर्जून त्यांच्या घरी जाणं व्हायचं. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या कार्यक्रमांना, नाटकांना माझ्या शाळेतल्या बाई आजही आवडीने येतात. त्यामुळेच नाईक बाई ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप खास आहे."

दरम्यान, नाईक बाईंची हृदयस्पर्शी गोष्ट  'आमच्या लाडक्या नाईक बाई'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 10 ऑगस्टपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका पाहता येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget