Bigg Boss 19 Pranit More: जिगरी मित्राला धोका, घरातील ठाम भूमिकांमुळे झाला विरोधाचा धनी; 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीपासून दूरच राहणार मराठमोळा प्रणीत मोरे?
या गेममध्ये तो ऍक्टिव्ह असला तरी प्रणित ट्रॉफीपासून दूरच राहण्याची शक्यता दिसते. चला जाणून घेऊया प्रणित मोरेचा सुरुवातीपासून खेळ कसा होता?

Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉस 19 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. नुकताच घरात तिकीट - टू- फिनालेचा टास्क झाला. या रेसमध्ये अशनूर कौर, प्रणित मोरे ,गौरव खन्ना, आणि फरहाना भट्ट हे चार स्पर्धक फायनलिस्ट झाले आहेत. आता बिग बॉसच्या घरात ट्रॉफीचे वेध लागले आहेत. शेवटच्या टप्प्यात स्पर्धा पोहोचलीये. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये उत्साह संचारलाय. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकतंय याकडे चाहत्यांचं विशेष लक्ष आहे. दुसरीकडे मराठमोळा प्रणित मोरे बिग बॉस 19च्या टॉप 8 मध्ये पोहोचला आहे.पण या शोमध्ये पुढे जाण्यासाठी त्याला खूपच मेहनत करावी लागत आहे.या गेममध्ये तो ऍक्टिव्ह असला तरी प्रणित ट्रॉफीपासून दूरच राहण्याची शक्यता दिसते. चला जाणून घेऊया प्रणित मोरेचा सुरुवातीपासून खेळ कसा होता?
Pranit More: कसा होता प्रणीतचा गेम?
सुरुवातीला प्रणित मोरेचा खेळ एवढ्या उंचीवर पोहोचेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. तो घरात थोडा शांत असायचा. घरातील गोष्टींवर आपलं मत व्यक्त करण्यास कचरायचा. बहुतेक वेळा तो या स्पर्धेत इतरांपेक्षा थोडा मागे राहिला. पण हळूहळू प्रणितचा खेळ सुधारला. घरात बराच काळ समजूतदारपणा दाखवत असलेला प्रणित शोमध्ये ऍक्टिव्ह झाला. अनेक प्रसंगांमध्ये जे बरोबर आहे त्यासाठी त्याने भूमिका घेतलेली दिसली. हळूहळू प्रणितला त्याच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबाही मिळू लागला. बिग बॉसच्या घरात त्याचे मजेशीर विनोद, स्टॅन्ड अप कॉमेडी चाहत्यांसाठी मनोरंजक बनली. याच शोमध्ये प्रणितचे मित्र अशनूर कौर आणि अभिषेक बजाज या दोघांना पाठिंबा दिल्याने प्रणितला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या तिघांच्या मैत्रीचेही कौतुक होताना दिसले.
या खेळात प्रणितचं जरा बरं चाललं होतं पण एका निर्णयामुळे प्रणितला सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं . बिग बॉसच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला. त्याची सकारात्मक प्रतिमा बदलू लागली. एका निर्णयामुळे प्रणितचा बिग बॉसच्या घरात डाउन फॉल सुरू झालेला दिसला.
ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आला प्रणित
बिग बॉसच्या शोमध्ये कधी कसा गेम फिरेल याची शाश्वती नसते. प्रणितच्या बाबतीतही असंच झालं. शोमध्ये अभिषेक बजाज खरंतर प्रणित मोरेचा सर्वात चांगला मित्र होता. प्रणिता ही अनेकदा शोवर म्हणायचा की अभिषेक त्याची पहिली प्रायोरिटी आहे. पण जेव्हा अभिषेक आणि अशनूर या दोघांपैकी एकाला वाचवण्याची संधी मिळाली तेव्हा प्रणितने त्याचा सर्वात चांगला मित्र अभिषेकला संपवले आणि अशनूरला वाचवले. प्रणिताच्या या निर्णयाने निर्माते स्पर्धक आणि बिग बॉसच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला. आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर प्रणितला मोठ्या ट्रॉलिंगचा सामना करावा लागला.
वीकेंड का वारमधील एका भागात टास्क दरम्यान जेव्हा एका स्पर्धकाला पुढे जाण्याची संधी मिळाली तेव्हा प्रणितने त्याचा मित्र गौरव खन्ना ऐवजी शहाबाद बदेशाची निवड केली. प्रणिताच्या या निर्णयामुळे गौरवलाही धक्का बसला. आधी अभिषेक आणि नंतर गौरव खन्नासोबत विश्वासघात केल्यामुळे चाहतेही प्रणित वर संतापले. सोशल मीडियावर प्रणितला बिग बॉस 19 चा सर्वात मोठा ढोंगी असल्याचं म्हटलं जात होतं.
स्वतःच्याच ग्रुपमधील स्पर्धकांना फसवून प्रणितने स्वतःचा गेम खराब केल्याचं म्हटलं जात आहे. त्याची प्रतिमा काहीशी नकारात्मक झाली आहे. अंतिम फेरी जसजशी जवळ येत आहे तसा त्याचा खेळ पुन्हा एकदा कमकुवत होता नाही दिसतोय. प्रणितने बिग बॉसच्या या खेळात बराच प्रवास केला आहे. पण तो विनर ट्रॉफी चा थोडासा दूर असल्यासारखाच वाटतोय. स्वतःच्याच मित्रांना फसवल्याने प्रणित किती काळ गेम मध्ये टिकून राहू शकतो हे पाहणं प्रेक्षकांसाठीही मनोरंजक ठरणार आहे .























