Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy: सुदेश म्हशीळकरांचं अकाउंट खरंच हॅक झालेलं? सायबर क्राईम टीमनं दिली महत्त्वाची माहिती, प्राची पिसाटकडून मोठा खुलासा
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy: अभिनेत्री प्राची पिसाटनं ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी तिला फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह्य मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे.

Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy: एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं दिग्गज मराठी अभिनेत्यानं केलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले. तेव्हापासूनच मराठी इंड्स्ट्री पुरती हादरुन गेली आहे. यापूर्वी बॉलिवूडमधून अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचचे अनुभव शेअर केलेले. पण, अभिनेत्रीनं थेट आलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. तसेच, दिग्गज अभिनेता असं करुच शकत नाही, त्याचं अकाउंट बहुदा हॅक झालं असावं, असा मेसेज प्राचीला अनेकांनी केला. त्यानंतर प्राचीनं सायबर क्राईम अधिकाऱ्यांना अभिनेत्याचं अकाउंट खरंच हॅक झालेलं का? यासंदर्भात तपास करायला सांगितला. त्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री प्राची पिसाटनं (Prachi Pisat) ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर (Sudesh Mhashilkar) यांनी तिला फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह्य मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्री हादरली. त्यानंतर काहींनी प्राचीला पाठींबा दिला, तर काहींनी प्राचीलाच असं नसेल, तसं नसेल असे मेसेज केले, एवढंच काय तर कदाचित अकाउंट हॅक झालं असेल, असंही काहींनी सांगितलं. त्यानंतर प्राचीनं अकाऊंट हॅक झालेलं नसून याआधीही त्यांनी असे मेसेज केलेत याचाही पुरावा सर्वांसमोर ठेवला. एवढ्या गंभीर प्रकरणानंतर अद्याप अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ना त्यांनी प्राचीची माफी मागितली. त्यामुळे त्यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चांना उधाण आलं.

प्राची पिसाटनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
प्राचीनं सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट करुन खुलासा केला. प्राची म्हणाली की, "मी माझ्या बाजूनं सायबर क्राईम अधिकाऱ्यांना विनंती करुन आधीच चेक आणि कन्फर्म केलं आहे की, त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही? त्यावेळी सायबर क्राईम टीमने सांगितलं की, एप्रिल पासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं."
प्राची पुढे म्हणाली की, "गेले 5 दिवस ते गप्प आहेत आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी ते कोणतीच प्रतिक्रिया देत नसतील तर मीडियामध्ये जे काही छापून येतंय, त्यासाठी माझी जबाबदारी नाही."
दरम्यान, प्राची पिसाटनं केलेल्या आरोपांवर अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, प्राचीनं आणखी एक पोस्ट करत पुन्हा एकदा सर्व माध्यमांना आवाहन केलंय. आपण कुणावरही कसलेही आरोप केलेले नाहीत, उलट आपण आपल्याला आलेल्या मेसेजचे फक्त स्क्रिनशॉर्ट शेअर केलेत. कारण आपल्याला विषय संपवायचा होता. त्यामुळे प्लीज मिसलीड करुन नका असं आवाहन तिनं माध्यमांना केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























