ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या फ्लर्टिंगचे मेसेज व्हायरल करणाऱ्या प्राची पिसाटचा यूटर्न? आता म्हणते, मी तर....
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy: प्राची पिसाटनं केलेल्या धाडसाचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. तसेच, तिला अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी पाठिंबाही दिला आहे. पण, आता प्राचीच्या नव्या पोस्टमुळे तिनं युटर्न घेतल्याचंही नेटकऱ्यांकडून बोललं जात आहे.

Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy: एकीकडे बॉलिवूड (Bollywood), हॉलिवूडमध्ये (Hollywood) कास्टिंग काउचचे (Casting Couch) भयावह अनुभव अभिनेत्री शेअर करत आहेत. तर, इकडे मराठी इंडस्ट्रीतील (Marathi Industry) एका लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टमुळे खळबळ माजली आहे. मराठी अभिनेत्री प्राची पिसाटनं (Prachi Pisat) अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला फेसबुकवर केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन हादरली. अभिनेते सुदेश म्हशीलकर (Sudesh Mhashilkar) यांनी 'तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस', असा मेसेज केलेला. प्राचीनं हा स्क्रिनशॉर्ट जाहीर करत अभिनेत्यावर अनेक आरोपही केले. पण, आता मात्र, प्राची पिसाटच्या नव्या पोस्टमुळे गोंधळ उडाला आहे. प्राचीची नवी पोस्ट वाचून हिला नेमकं म्हणायचंय काय? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
प्राची पिसाटनं आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यामध्ये तिनं म्हटलंय की, "डिअर मिडिया चॅनेल्स आणि अकाऊंट्स थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट आणि दयाळूपणासाठी. प्लिज नोट, मी आरोप वगैरे काही केल नाहीत. फक्त रिल्पाय आणि स्क्रिनशॉट शेअर केलेत. विनंती आहे की, प्लिज चुकीचे शब्द वापरू नका. तुम्ही सगळे अद्भूत आहात. फक्त विनंती आहे. तुम्ही मिसलीड न करता सपोर्ट कराल, याची मला आशा आहे."

सुदेश म्हशीलकरांच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करताना प्राची काय म्हणालेली?
सुदेश म्हशीलकरांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राची पिसाटनं लिहिलेलं की, "...आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच, ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशीलकर..." प्राचीला तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये 7 एप्रिल रोजी सुदेश यांचा आणखी एक मेसेज आला होता. त्याचाही स्क्रीनशॉट तिनं शेअर केला आहे. त्यात सुदेश यांनी म्हटलंय, "खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली, वाह!" या स्क्रीनशॉटवर प्राचीने म्हटलंय, "हो.. आणि खूप बोलायलाही लागलीये हल्ली. चुकीच्या मुलीशी पंगा घेतलास काका. चुकलंच नाही का तुमचं?"
आता प्राचीचं म्हणणं आहे की, तिनं फक्त रिप्लाय आणि स्क्रिनशॉट शेअर केलेत. तिनं कोणतेही आरोप केलेले नाहीत, प्राचीच्या या वक्तव्यानंतर गोंधळ वाढला आहे. प्राचीनं आरोप केले नाहीत मग काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच, तिने माध्यमांना विनंती केली की, चुकीचे शब्द वापरू नका आणि मिसलीडिंग बातम्या न पसरवण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, प्राची पिसाटनं केलेल्या धाडसाचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. तसेच, तिला अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी पाठिंबाही दिला आहे. पण, आता प्राचीच्या नव्या पोस्टमुळे तिनं युटर्न घेतल्याचंही नेटकऱ्यांकडून बोललं जात आहे. अशातच अद्याप सुदेश म्हशीलकर यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, येत्या काळात आता हे प्रकरणं कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध'; प्राची पिसाटला लोकप्रिय अभिनेत्रींचा पाठिंबा
























