एक्स्प्लोर

Popular Singer Ishani Dave Retirement Rumours: अरजित सिंहपाठोपाठ सुप्रसिद्ध गायिकेचे संगीतविश्वातून निवृत्तीचे संकेत; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाली...

Popular Singer Ishani Dave Retirement Rumours: सोशल मीडियावर पोस्ट करुन गायिका इशानी दवेनं आपला निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबतच म्युझिक इंडस्ट्रीतल्या अनेक गोष्टींवर थेट भाष्य केलं आहे. 

Popular Singer Ishani Dave Retirement Rumours: आपल्या आवाजानं सर्वांना भूरळ घालणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) यानं नुकतीच प्ले बॅक सिंगिंगमधून (Playback Singing) निवृत्ती जाहीर केली. अरजितनं घेतलेल्या निर्णयानं चाहत्यांना पुरता धक्का बसला. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असूनही गायकानं एकाएकी घेतलेल्या निर्णयानं चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. अरजितनं घेतलेल्या निर्णयाच्या धक्क्यातून सावरत नाहीत, तेवढ्यात आता एका सुप्रसिद्ध गायिकेनं  संगीतविश्वाला अलविदा म्हटलं आहे. त्यासोबतच या गायिकेनं संगीतविश्वावर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिका इशानी दवे (Gujarati Singer Ishani Dave) हिनं संगीतविश्वाला रामराम म्हटलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन इशानीनं आपला निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबतच म्युझिक इंडस्ट्रीतल्या अनेक गोष्टींवर थेट भाष्य केलं आहे. 

सोशल मीडिया पोस्टमध्ये गायिका इशानी दवे काय म्हणाली?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये इशानी दवे हिनं म्हटलंय की, "एकेकाळी संगीत म्हणजे, श्वास घेण्याइतकं सोपं, प्रामाणिक आणि जिवंत होतं. प्रत्येक स्वर कुठल्यातरी खऱ्या भावनेतून निर्माण होत असे. रंगमंचावर गाण्याचं सादरीकरण करणं माझ्यावर कधीच दडपणाचं नव्हतं, तर ते माझं घर होतं. पण मग सारं काही बदलून गेलं. ज्या गोष्टीवर मी जिवापाड प्रेम केलं, तिचं रूपांतर हळूहळू एका बेडीत झालं. स्वप्नांची जागा डेडलाईन्सने घेतली, मनातील भावनांची जागा अपेक्षांनी घेतली आणि या सगळ्या प्रवासात कुठेतरी मी स्वतःलाच हरवून बसले..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishani Dave (@ishanipdave)

"मी गाणं सुरूच ठेवलं, पण पूर्वीसारखं काही वाटत नव्हतं. माझा सूर आणि आवाज होता, पण त्यात आत्मा उरला नव्हता. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल? तर ज्या गोष्टीवर मी इतकं मनापासून प्रेम केलं, तिच गोष्ट आता मला जड वाटू लागली होती. मी संगीत हरवलंय असं मला वाटत नाही. कदाचित मी संगीताकडे जाणारी माझी वाट हरवून बसले आहे.", असं इशानी दवे हिनं म्हटलं आहे. 

"कदाचित एखाद्या दिवशी मला माझी जुनी 'मी' पुन्हा सापडेल, अशी मुलगी जी कुणीतरी ऐकावं म्हणून नाही, तर स्वतःच्या आत खोलवर दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी गाईल. पुन्हा भेटुयात एका नव्या वळणावर!", अशी पोस्ट लिहून इशानीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, गायिका इशानी दवेच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, तिला तिचा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणीसुद्धा केली आहे. काहींनी तर तिला घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, असं सुचवलं आहे. तर, काहींनी "तू तुझा वेळ घे आणि परत कमबॅक कर...", असं म्हणत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Palash Muchhal Controversy: स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल पुन्हा गोत्यात, गंभीर प्रकरणी सांगलीत गुन्हा दाखल; स्मृतीच्या मित्राकडून 25 लाख घेतले अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget