एक्स्प्लोर

Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

Poetess Shanta Shelke House Collapsed: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

Poetess Shanta Shelke House Collapsed: मराठीतल्या साहित्याचा (Marathi Literature) अमूल्य ठेवा जपणाऱ्या आणि आपल्या शब्दांची गुंफण घालून कवितांनी स्तब्ध करणाऱ्या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक आणि पत्रकार असलेल्या शांता शेळके (Poetess Shanta Shelke). मराठीतल्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री (Marathi Poetess). मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि संवेदनशील लेखिका म्हणून त्यांची ओळख. आता त्या आपल्यात नाहीत, पण, त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, त्यांचं बालपणे जिथे गेलं, जिथे त्यांच्यावर शब्दांचे संस्कार झाले, तो त्यांचा वाडा. पण, सतत कोसळणाऱ्या पावसानं  ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (Veteran Poetess Shanta Shelke) यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला आहे. 

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (Shanta Shelke) यांच्या स्मृतींशी निगडित असलेल्या मंचर (Manchar Pune) येथील ऐतिहासिक वाड्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाड्याचा काही भाग कोसळल्यानं साहित्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हा केवळ एका इमारतीचा भाग कोसळण्याचा प्रकार नसून, मराठी साहित्याच्या सांस्कृतिक वारशालाच तडा गेल्याची भावना व्यक्त केली जातेय.

पुणे जिल्ह्यातील (Pune News) आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) मंचर येथे असलेला शांता शेळके यांचा वाडा आजही त्यांच्या साहित्यिक आठवणी जपून उभा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ऐतिहासिक वास्तूचा काही भाग शुक्रवारी कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी वारसा जतनाच्या दृष्टीनं हा अत्यंत चिंताजनक प्रकार मानला जात आहे.


Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

कवयित्रींच्या स्मृतींशी जोडलेली ही वास्तू तातडीनं जतन करा; स्थानिकांची मागणी

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाड्याची अवस्था मागील काही वर्षांपासून अगदीच जीर्ण झालेली. मंचर नगरपंचायतीनं वेळोवेळी दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रभावी संवर्धन आणि दुरुस्ती न झाल्यानं अखेर पावसाच्या तडाख्यात वाड्याचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर मंचरमधील ग्रामस्थ, साहित्यप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केलीय. मराठी साहित्यविश्वाला असंख्य अजरामर कविता, गीतं आणि लेखन देणाऱ्या कवयित्रींच्या स्मृतींशी जोडलेली ही वास्तू तातडीनं जतन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

स्थानिकांचं म्हणणं आहे की, हा वाडा केवळ एक जुना बांधकामाचा नमुना नसून मराठी साहित्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. त्यामुळे या वास्तूचं तातडीने संवर्धन, दुरुस्ती आणि संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर पावलं उचलावीत. शांता शेळके यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे भवितव्य आता प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून असून, सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

मराठीतल्या साहित्याचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या कवयित्री शांता शेळके 

शांता जनार्दन शेळके या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक आणि पत्रकार होत्या. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर इथे झाला. मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि संवेदनशील लेखिका म्हणून त्यांची ओळख. कविता, ललित लेख, कथा, कादंबरी, बालसाहित्य, अनुवाद आणि चित्रपट गीतलेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलंय.

मराठी सिनेमे आणि भावगीत विश्वातही त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांनी लिहिलेली अनेक गीतं आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. 'ही वाट दूर जाते', 'रेशमाच्या रेघांनी', 'जाईन विचारत रानफुला', 'काटा रुते कुणाला', 'तोच चंद्रमा नभात' यांसारखी अनेक अजरामर गीतं त्यांनी लिहिलीत. त्यांच्या गीतांना सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे यांसारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीत दिलंय, तर लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते, सुरेश वाडकर यांसारख्या गायकांनी स्वरबद्ध केलंय. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget