Payal Rohatgi Sangram Singh Speculation Of Divorce: लग्नाच्या 3 वर्षांतच स्टार कपलचा घटस्फोट? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हायरल पोस्टनंतर चर्चांना उधाण, काय म्हणाली?
Payal Rohatgi Sangram Singh Speculation Of Divorce: पायल रोहतगीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्टच पायल आणि संग्रामच्या घटस्फोटाच्या अफवांना कारणीभूत ठरली आहे.

Payal Rohatgi Sangram Singh Speculation Of Divorce: टेलिव्हिजन अभिनेत्री (Television Actress) पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तीन वर्षांपूर्वी पहलवान संग्राम सिंहशी (Sangram Singh) आपली लग्नगाठ बांधलेली. पण, आता मात्र तीन वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघेही काडीमोड घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पायल रोहतगीनं सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट केली आहे. ही पोस्टच पायल आणि संग्रामच्या घटस्फोटाच्या (Payal Rohatgi Sangram Singh Divorce?) अफवांना कारणीभूत ठरली आहे. तसेच, पायल रोहतगीनं संग्रामच्या कंपनीतून राजीनामाही दिला आहे.
पायल रोहतगीनं राजीनामा पत्राचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं लिहिलेलं की, "वैयक्तिक कारणांमुळे मी संग्राम सिंह चॅरिटेबल फाउंडेशनच्या संचालक पदावरून तात्काळ राजीनामा देत आहे. मी बोर्डाला विनंती करते की, कृपया माझा राजीनामा स्वीकारावा आणि कंपनी रजिस्ट्रारकडे आवश्यक फॉर्म दाखल करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत. फाउंडेशनमध्ये सामील होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो आणि संस्थेला तिच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळावं, अशी मी इच्छा व्यक्त करतो."
पायलनं पोस्ट करताना एक क्रिप्टिक कॅप्शन शेअर केलं आहे. पायलनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कधीकधी शांतता अंतरासारखी दिसते...". पायलनं दिलेल्या या क्रिप्टिक कॅप्शनमुळे तिच्या वैवाहित जीवनात सर्वाकाही ठीक नाही, अशा अफवांनी जोर धरला आहे. दरम्यान, पायल किंवा संग्राम दोघांनाही अधिकृतपणे घटस्फोटाबाबत काहीही माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
दोघांचा भांडतानाचा व्हिडीओ व्हायरल
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पायल आणि संग्रामचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही वाद घालताना दिसलेले. यामध्ये तिनं संग्रामवर आरोप केला होता की, तिला मूल होत नसल्यामुळे संग्राम तिला वाईट वागणूक देत आहे. तसेच, तिनं संग्रामच्या कुटुंबीयांविरोधात महिलांविरुद्ध विचार ठेवणारं कुटुंब असल्याची टीका केलेली. संग्रामच्या कुटुंबीयांच्या मते, महिलांचं काम फक्त जेवण बनवणं, मूलं जन्माला घालणं आणि डोक्यावर पदर घेऊन राहणं हेच आहे, असा आरोप पायलनं केलेला.
आई होऊ शकत नसल्यामुळे टोमणे
मिडिया रिपोर्ट्सनुसार, पायलनं असंही अनेकदा म्हटलेलं की, "तुझ्या घरात स्त्रियांसोबत असं बोललं जातं... तुम्ही शिकलेले नाही, ठीक आहे... पण असं कसं बोलू शकता..." तसेच, तिनं संग्रामला खडसावून सांगितलेलं की, पुन्हा कधीच तिला आई न होण्यावरुन अजिबात टोमणे मारायचे नाहीत.
2022 मध्ये झालेलं लग्न
पायल आणि संग्रामनं अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर 9 जुलै 2022 रोजी आग्र्यामध्ये आपली लग्नगाठ बांधलेली. अशातच आता पायलच्या क्रिप्टिक पोस्टमुळे 3 वर्षांनी दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Alia Bhatt PA Arrested: आलिया भट्टची 77 लाखांची फसवणूक; पर्सनल असिस्टंटला अटक, काय घडलं?























