'अगं वेडी झालीयेस का?..' गरोदरपणात बेबी बंपसह पायल मलिकने लगावले ठुमके; नेटकऱ्यांनी झोड झोड झोडलं
Payal Malik Dances in Viral Instagram Videos: पायल मलिक चौथ्यांदा होणार आई. बेबी बंपसह गाण्यांवर लगावले ठुमके. प्रेग्नंसी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

Payal Malik Dances in Viral Instagram Videos: युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी स्पर्धक अरमान मलिकच्या घरात लवकरच एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. त्याची पत्नी पायल मलिक तिसऱ्यांदा गर्भवती आहे. चौथ्या मुलाला जन्म देणारी पायल मलिक सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. पायल मलिकने तिचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बेबी बंपवर वेगवेगळे इमोजी स्टिकर्स दिसत आहेत. तसेच ती हरियाणवी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. पायलच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पायल चौथ्यांदा आई होणार आहे. पायलने तिचे अनेक डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बेबी बंप दाखवत ती डान्स करताना दिसत आहे. तर, काही व्हिडिओंमध्ये पायल अरमानसोबत नाचताना दिसत आहे. तर, काही व्हिडिओंमध्ये तिचे मुलेही दिसत आहेत. पायलने तिचे काही सोलो डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियात शेअर केले आहेत. दरम्यान, तिच्या व्हिडिओंवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एका व्यक्तीनं 'तुम्हाला वेड लागले आहे का?' असा प्रश्न विचारला. तर, दुसऱ्याने, 'तुमच्या पोटात बाळ आहे, आराम करा.. आणि हे नाटक थांबवा', अशी कमेंट केली आहे. तर, काहींनी पायल मलिक वेडी झाली आहे का? असा प्रश्न विचारत तिच्यावर संताप व्यक्त केला.
युट्यूबर अरमान मलिकने दोनवेळा लग्नगाठ बांधली
View this post on Instagram
युट्यूबर अरमान मलिकने दोनदा लग्न केले आहे. त्यानं 2011 साली पायल मलिकशी विवाह केला होता. लग्नानंतर त्यांना चिरायू मलिक हा मुलगा झाला होता. नंतर आयव्हिएफद्वारे तिला अयान आणि तुबा ही दोन मुले झाली. पायलसोबतच्या लव्हस्टोरीबाबत अरमानना म्हणाला, पायलसोबतच्या भेटीच्या सातव्या दिवशी, आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले. तर, 2018 साली कृतिका अरमानच्या आयुष्यात आली. कृतिका अरमानच्या सर्वात जवळची मैत्रीण होती. पण अरमाननं कृतिकासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. पायलला घटस्फोट न देता अरमानने कृतिकाशी लग्नगाठ बांधली.
मिळालेल्या माहितीनुसार, कृतिका अरमानला चिरायूच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटली. तिघांनी एकत्र मिळून कुटुंब म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये, जेव्हा पायलने जुळ्या मुलांना जन्म दिला, तेव्हा कृतिका एका मुलाची आई झाली होती. अरमान सध्या चार मुलांचा वडील आहे.
पायल मलिकचा व्हिडिओ व्हायरल:
View this post on Instagram























