एक्स्प्लोर

Parineeti Raghav Baby Boy Name: परिणीती-राघव चड्ढानं मुलाचं नाव ठेवलं; इन्स्टा पोस्ट करुन अर्थही सांगितला, पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक

Parineeti Raghav Baby Boy Name: 19 नोव्हेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा मुलगा एक महिन्याचा झाला. यानिमित्ताने दोघांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट टाकलीये.

Parineeti Chopra son: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (Raghav Chaddha) हे साधारण महिन्याभरापूर्वी आई बाबा झाले. आता या स्टार कपलनं आपल्या लाडक्या मुलाच्या इवल्याशा पावलांची झलक चाहत्यांना दाखवत त्याचं नामकरण केल्याचा खास उलगडा केलाय. बाळाच्या नावामागचं सुंदर आणि अर्थपूर्ण तत्व त्यांनी एक पोस्ट शेअर केलीय. 19 नोव्हेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा मुलगा एक महिन्याचा झाला. यानिमित्ताने दोघांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट टाकलीये. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या बाळाच्या नावाचा अर्थ समजावत मुलाचं नाव सांगितलं आहे. 

13 मे 2023 रोजी दिल्लीत या जोडप्याचा विवाह झाला .त्यांच्या समारंभाला जवळचे नातेवाईक आणि अरविंद केजरीवाल, भगवंत मानसारखे राजकीय नेते उपस्थित होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथे त्यांनी लग्न केलं.परिणीती शेवटची इम्तियाज अलीच्या 'अमरसिंह चमकीला ' या चित्रपटात दिसली होती.  2025च्या दिवाळीत परिणीतीच्या घरी गोड बातमी आली. त्यांनी मुलगा झाल्याचे सांगत एक पोस्टही चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता परिणीती आणि राघवचं बाळ एक महिन्याचं झालंय. त्यांनी बाळाच्या चिमुकल्या पावलांचा फोटो पोस्ट करत त्याचं नामकरण चाहत्यांशीही शेअर केलं आहे. 

Parineeti Chopra: काय ठेवलं मुलाचं नाव ? 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाने त्यांच्या बाळाचं नामकरण केलं असून त्याच्या नावाचा अर्थासहित त्यांनी चाहत्यांसोबत ही गोड पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये बाळाच्या चिमुकल्या पावलांची झलक दाखवत त्यांनी बाळाचं नाव ' नीर ' ठेवल्याचं सांगितलं.   चाहत्यांसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "जलस्य रूपम प्रेमस्य स्वरूपम - तत्र एव नीर। आमच्या मनाला या जीवाच्या अनंत थेंबाएवढी शांतता मिळाली. आम्ही त्याचं नाव 'नीर' ठेवलं. शुद्ध, दिव्य, असीम." विशेष म्हणजे 'नीर' हे नाव परिणीती आणि राघव यांच्या नावाचा एक अप्रतिम कॉम्बिनेशनही आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या नावाबद्दल असलेलं आकर्षण आणखी वाढलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @parineetichopra

या पोस्ट सोबत त्यांनी मुलाच्या गोंडस पावलांचा फोटोही शेअर केला. ही पोस्ट बघता बघता वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या पोस्टवर या जोडप्यावर आनंदाचा वर्षाव केलाय. काहींनी 'नीर' नाव अतिशय सुंदर असल्याचं सांगत परिणीती आणि राघवला शुभेच्छा दिल्यात.

परी आणि राघव यांनी 19 ऑक्टोबर रोजी चाहत्यांना गुड न्यूज देत सांगितलं होतं की त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. तेव्हापासून चाहत्यांना या बाळाचं नाव आणि त्याची पहिली झलक पाहायची उत्सुकता होती. आणि अखेर आता चाहत्यांची इच्छाही पूर्ण झाली आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी 2023 मध्ये उदयपूर मधील पिचोला तलावाच्या काठावर अत्यंत सुंदर आणि स्वप्नवत लग्न केलं होतं.काही महिन्यांच्या डेटिंगनंतर त्यांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारलं. परिणीती सध्या 37 वर्षांची असून राघवही जवळपास त्याच वयाचा आहे. दोघांच्या करिअरमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी कुटुंब पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि आता 'नीर' च्या आगमनाने आयुष्यात नवी उमेद आणि आनंदाची भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget