Paresh Rawal Exits Hera Pheri 3: अक्षय कुमारनं 'हेरा फेरी 3' सोडणाऱ्या परेश रावल यांच्याकडून एक-एक पैसा वसूल केला; 15 टक्के व्याजासह 11 लाख रुपये परत घेतले
Paresh Rawal Exits Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3'ची निर्मिती अक्षय कुमारची कंपनी 'केप ऑफ गुड फिल्म्स' करत आहे. यांनी परेश रावल यांना 25 कोटींची लीगल नोटीस धाडली.

Paresh Rawal Exits Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैय्या ही नावं ऐकली की, खुदकन हसू येतं. एवढंच काय तर, 'हेरा फेरी 3'मधील काही सीन्स डोळ्यांसमोर उभे राहतात. पण, आता 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) येणार की नाही? आणि जरी चित्रपट आलाच तर त्यामध्ये राजू, श्याम आणि बाबू भैय्याचं त्रिकुट पाहायला मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, सिनेमाची घोषणा झाल्यानंतर बाबू भैय्याची भूमिका पडद्यावर अजरामर करणारे अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी सिनेमातून एग्झिट घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर मोठा वाद सुरू झाला. 'हेरा फेरी 3'ची निर्मिती अक्षय कुमारची (Akshay Kumar) कंपनी 'केप ऑफ गुड फिल्म्स' करत आहे. यांनी परेश रावल यांना 25 कोटींची लीगल नोटीस धाडली. अशातच आता माहिती मिळतेय की, परेश रावल यांनी चित्रपटासाठी घेतलेली सायनिंग अमाउंट परत केली आहे. म्हणजे, आता 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैय्या नसतील अशी माहिती मिळत आहे.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' च्या निर्मात्यांना 11 लाख रुपये परत केले आहेत, जे त्यांना सायनिंग अमाउंट म्हणून मिळाले होते. त्यांनी सिनेमातून बाहेर पडल्याबद्दल 15 % वार्षिक व्याज आणि काही अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून परत केली असल्याची माहिती मिळत आहे.
15 टक्के वार्षिक व्याजासह परेश रावल यांनी अक्षय कुमारला पैसे दिले
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "परेश रावल यांनी कराराची 15 टक्के रक्कम वार्षिक व्याजदरानं परत केली आहे आणि फ्रँचायझी सोडण्यासाठी काही अतिरिक्त पैसे देखील दिले आहेत."
'हेरा फेरी 3'साठी परेश रावल यांनी घेतलेलं 15 कोटींची मानधन
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावल यांचं चित्रपटासाठी एकूण मानधन 15 कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं, त्यांच्या टर्म शीटमध्ये अॅन्युअल क्लॉजही होता. 'हेरा फेरी 3' प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एका महिन्यानंतर त्यांना उर्वरित 14.89 कोटी रुपये मिळणार होते. 'हेरा फेरी 3'चं चित्रीकरण पुढच्या वर्षापासून सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच, रिलीजची तारीख 2026 च्या अखेरीस किंवा 2027 मध्ये निश्चित केली जाईल, असं म्हटलं जात होतं.
फिल्म रिलीज झाल्यानंतर मिळणार होते पैसे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टर्म शीटनुसार, परेश रावल यांना कराराची रक्कम म्हणून 11 लाख रुपये देण्यात आले होते. त्यांची एकूण फी 15 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एका महिन्यानंतर परेश रावल यांना उर्वरित रक्कम 14.89 कोटी रुपये मिळतील, असं टर्म शीटमध्ये नमूद करण्यात आलं होतं."
बराच वेळ वाट पाहिल्यामुळे सोडला चित्रपट
पैसे मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, परेश रावल यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांच्या आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्समध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली. कंपनीनं परेश रावल यांना 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं फक्त प्रोमो शूट आतापर्यंत पूर्ण झालं आहे, जे भूत बांगलाच्या सेटवर चित्रपटाच्या क्रूसोबत करण्यात आलं होतं.























