Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
फैसलच्या या मराठी गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. अनेक मराठी कलाकारांनी आणि नेटकरांनी अक्षरश: या तरुणाला डोक्यावर घेतलंय. आता प्रचंड कौतुक होताना दिसतंय.

Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: कॉमेडियन समय रैना (Samay Raina) कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. त्याच्या 'इंडियाज गॉट लेटंट 2' (India's Got Latent 2) शोमधील एका मुलाची सध्या एकच चर्चा रंगली आहे. टांझानिया या देशातील या तरुणाने थेट मराठी गाणं गाऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या मराठी गाण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय. या व्हिडिओवर अनेक जण प्रतिक्रिया देत असून बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी, 'इंडियाज गॉट लेटंट 2' च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता सुकृत देवने सगळ्यांची मनं जिंकली होती. आता टांझनियामधून आलेल्या या तरुणानं मराठी गाणं गाऊन सगळ्यांनाच अवाक केलं.
टांझानियाचा तरुण मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला
'इंडियाज गॉट लेटंट 2' च्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या एपिसोड मध्ये टांझानिया देशातील फैजल नावाचा तरुण सहभागी झाला होता. दुसऱ्या देशातला असला तरी बॉलीवूडची आवड भारताविषयीचे प्रेम आणि हरियाणवी, पंजाबी, हिंदी, तमिळ, मराठी अशा अनेक भारतीय भाषा येत असल्याचं पाहून उपस्थित सगळेच थक्क झाले होते. समय रैनाने त्याला ' मला मराठी येते का ? ' असा प्रश्न विचारला. त्यावर फैजलनं उत्तीर देत म्हटलं 'मला मराठी बोलता येत नाही, पण गाता नक्की येतं.' आणि त्याने मराठीत गाणंच म्हणायला सुरुवात केली. 'मराठमोळी थोडीशी साधीभोळी' गाजलेलं गाणं त्याने गाऊन दाखवलं. एखाद्या परदेशी तरुणाने इतक्या अचूक उच्चारात मराठी गाणं गायल्यामुळे उपस्थित मंडळींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं.
View this post on Instagram
फैसलच्या या मराठी गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. अनेक मराठी कलाकारांनी आणि नेटकरांनी अक्षरश: या तरुणाला डोक्यावर घेतलंय. आता प्रचंड कौतुक होताना दिसतंय.





















