Marathi actress : मराठी अभिनेत्रीने केलं होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
Marathi actress : परदेशात स्थायिक असलेल्या मराठी अभिनेत्रीने नुकतच तिच्या होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल केलं आहे.
![Marathi actress : मराठी अभिनेत्रीने केलं होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ Neha Gadre Marathi actress shared her baby Gender reveal ceremony Video on Social Media Marathi actress : मराठी अभिनेत्रीने केलं होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/31/b2391c5482251f12bc20f1f426023faa1730387753574720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi actress : अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) ही बऱ्याच मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मन उधाण वाऱ्याचे या मालिकेमुळे नेहाला विशेष पसंती मिळाली. याच मलिकेमुळे नेहा ही घराघरांत पोहचली. पण आता अभिनयापासून दूर जात नेहा तिच्या पतीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. काहीच दिवसांपूर्वी नेहाने चाहत्यांसोबत ती गरोदर असल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्यानंतर आता नेहाने तिच्या जेंडर रिव्हिल कायक्रमाचा व्हिडीओ शेअर केले आहेत.
नेहाने नुकतच तिच्या बाळाचं जेंडर रिव्हिल केलं आहे. यामध्ये नेहाला मुलगा होणार असल्याचं समोर आलंय. नेहाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदनही केलंय. आता नेहा लवकरच तिच्या बाळाचं स्वागत करणार आहे. नेहाच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी तिने हा जेंडर रिव्हीलचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नेहाच्या घरातीलही मंडळी उपस्थित होती.
नेहा सध्या काय करते?
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे नेहाला विशेष पसंती मिळाली. पण नेहा 2 मार्च 2019 रोजी ईशान बापटसोबत लग्नबंधनात अडकली आणि त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. नेहा तिच्या लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून मात्र दुरावली. पण नेहाने ऑस्ट्रेलियामध्ये जर्मन भाषेचं शिक्षण घेतलं आहे. त्यातच तिने पदवीही संपादन केली असून त्यामध्येच सध्या ती करिअर करत आहे. तसेच आता ती लवकरच एका गोंडस मुलालाही जन्म देणार आहे.
नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल
दरम्यान नेहाने मालिका आणि सिनेमे अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर झी मराठी वाहिनीवरील अजूनही चांदरात आहे या मालिकेत नेहाने रेवा ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांची बरीच पंसती मिळाली. तसेच नेहा मोकळा श्वास हा मराठी सिनेमातही झळकली होती.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
DDLJ सिनेमाच्या शुटींगदरम्यानच अभिनेत्रीला मिळाली पतीच्या निधनाची बातमी, नेमकं काय घडलं होतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)