Pankaj Dheer Directed First Indian Adult Film: पंकज धीर यांनी बनवलेली देशातली पहिली 'अश्लील फिल्म', कॅनडाहून आलेला कॅमेरा क्रू, हॉटेलच्या बंद खोलीत झालेली शुटिंग
Pankaj Dheer Directed First Indian Adult Film: पंकज धीर यांनी भारतातली पहिली अडल्ट फिल्म बनवलेली. 1983 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या या फिल्मचं नाव 'बॉम्बे फँटेसी' (Bombay Fantasy) होतं.

Pankaj Dheer Directed First Indian Adult Film: बीआर चोप्रांच्या महाभारतातला कुंतीपुत्र कर्ण, म्हणजेच दिग्गज अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. पंकज धीर (Pankaj Dheer) यांना यापूर्वीही कॅन्सरचं निदान झालेलं, पण त्यावर यशस्वी मात केलेली. पण, काही महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. दमदार अभिनयामुळे पंकज धीर यांनी टेलिव्हिजन सीरिअल्ससह, सिनेमांमध्येही आपली छाप सोडली. त्यांनी आजवरच्या आपल्या करिअरमध्ये 25 हून अधिक फिल्म्समध्ये काम केलंय. दरम्यान, पंकज धीर यांच्याबाबतची एक गोष्ट फारच कमी लोकांना माहीतीय की, पंकज धीर यांनी भारतातली पहिली अडल्ट फिल्म बनवलेली. 1983 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या या फिल्मचं नाव 'बॉम्बे फँटेसी' (Bombay Fantasy) होतं. पंकज धीर यांनी स्वतः ही फिल्म दिग्दर्शित केलेली.
अभिनेता निकितिन धीर यांचे वडील आणि अभिनेत्री कृतिका सेंगर यांचे सासरे पंकज धीर यांनी आपल्या मागे चित्रपटसृष्टीचा एक मोठा वारसा सोडला आहे. बीआर चोप्रांच्या महाभारतात त्यांनी कर्णाची भूमिका साकारल्यानंतर ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. त्यांनी साकारलेला कर्ण फक्त घराघरांतच पोहोचला नाही, तर त्यांनी देशातील प्रत्येकाच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. त्यांची कर्णाची भूमिका एवढी गाजली की, शाळेच्या पुस्तकांमध्ये कर्ण म्हणून त्यांचा फोटो छापण्यात आला होता. कर्नाल आणि बस्तरमधील कर्ण मंदिरांमध्ये त्यांच्या पूर्ण आकाराच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत, एवढंच नाहीतर या मूर्तींची दररोज पूजाही केली जाते. याच कर्णानं 1983 मध्ये पहिला भारतीय अडल्ट सिनेमा केलेला, त्याचं नाव 'बॉम्बे फँटेसी'.
पंकज धीर यांनी स्वतः केलेलं दिग्दर्शन
पंकज धीर यांनी भारतातील पहिला अडल्ट सिनेमा 'बॉम्बे फॅन्टसी' चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं, तर प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक मजहर खान यांनी त्याची निर्मिती केली होती. चित्रपटसृष्टीत 'नील कुमार' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते के.एन. सिंह यांचे पुत्र विभूषण सिंह पॉल यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.
एक रुम, दोन कपल्सचा इंटिमेट सीन
'बॉम्बे फॅन्टसी' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'अडल्ट सर्टिफिकेट' देण्यात आलेलं. भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच दोन जोडप्यांचा इंटिमेट सीन दाखवण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. यामुळेच हा चित्रपट अश्लील चित्रपट म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता. हा चित्रपट 1 जानेवारी 1983 रोजी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला.
कॅनडाहून बोलावलेले कॅमेरामन, मुंबईतल्या एका हॉटेलात झालेलं शूट
देशातील पहिल्या अडल्ट फिल्मसाठी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाहून कॅमेरा क्रू बोलावण्यात आलेला. फिल्मचा हा बेडरुम सीन मुंबईतील प्रसिद्ध 'सन अँड सैंड हॉटेल'मध्ये दिग्दर्शित करण्यात आलेला. यासाठी कॅनडाहून कॅमेरा क्रू आणि अॅक्टर्स कित्येक दिवस याच हॉटेलात राहिले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























