(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suraj Chavan Birthday : 'तू जिंकलेलं महाराष्ट्रातील प्रत्येक मन...', मिठी मारताना अश्रू अनावर; सूरजच्या वाढदिवसासाठी पॅडीदादांची खास पोस्ट
Suraj Chavan Birthday : सूरज चव्हाणच्या वाढदिवसानिमित्त पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादांनी खास पोस्ट केली आहे.
Suraj Chavan Birthday : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातून प्रत्येक घरात पोहचलेल्या सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. त्यातच आता बिग बॉसच्या घरात त्याच्यासोबत सावलीसारख्या असलेल्या पॅडी दादांनीही (Pandharinath Kamble) खास पोस्ट केली आहे. तसेच त्यांचा एक भावनिक व्हिडिओही शेअर केलाय.
बिग बॉसच्या घरामध्ये पॅडी दादा आणि सूरजचं नातं फार घट्ट झालं. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही सूरजने पॅडी दादांचे आभार मानले. त्याचप्रमाणे त्याला पॅडी दादांनी बिग बॉसच्या घरात जशी साथ दिली त्यावरही त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पॅडी दादांची पोस्ट नेमकी काय?
पॅडी दादांनी सूरजसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत जात असतात, परंतु काही माणसं अशी येतात की ती कायमची मनात घर करून जातात. ‘सूरज चव्हाण’ हे नाव माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं होऊन जाईल याचा मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. बिग बॉसच्या घरात असताना तुझ्या सोबत जे काही थोडे फार क्षण मला घालवता आले ते मी कधीही विसरू शकत नाही.
पुढे त्यांनी म्हटलं की, आपलं शिक्षण किती? आपली आर्थिक परिस्थिती काय? आपण कलाकार म्हणून कसे आहात? आपण चार चौघात कसे राहतो, कसे वागतो? याचा आपण रोजच्या जगण्यात किती तरी वेळा विचार करत असतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्षरशः फाट्यावर मारून तू फक्त तुझ्यातल्या ‘माणूसकीने’ संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकतो. तेव्हा तुझ्यातल्या माणूसपणाचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. तुला आज यशाच्या शिखरावर पाहून उर अभिमानाने भरून येतो. तू कमावलेलं हे यश आणि तू जिंकलेलं महाराष्ट्रातील प्रत्येक मन हे कायम तुझ्यासोबत राहो, याच तुझ्या वाढदिवसानिमित्त निमित्त तुला शुभेच्छा!
View this post on Instagram