Panchayat Season 4 Release Date: पंचायत4 च्या रिलीज डेटविषयी मोठी अपडेट, कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? जाणून घ्या सविस्तर
Panchayat Season 4 Release Date: पंचायतच्या तिसऱ्या सीझननंतर आता चाहत्यांना चौथ्या सीझनचीही फार उत्सुकता लागून राहिली आहे. पण पंचायत 4 कधी येणार याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Panchayat 4 Release Date: ओटीटीवरील लोकप्रिय सीरिजपैकी पंचायत (Panchayat 4 ) ही एक सीरिज आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन भाग आले असून तिन्ही भागांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. 'पंचायत'चा सचिव असो किंवा प्रधान, यातलं प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपल्या जवळचं वाटतं. नुकताच या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. जो प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. तेव्हापासून या सिरिजच्या चौथ्या सिझनची चर्चा सुरु झाली.
दरम्यान पंचायतचा तिसरा सिझन कधी येणार याची प्रेक्षक सध्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचप्रमाणे चौथ्या सिझनमध्ये कथानक कसं असेल याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच आता 'पंचायत 4' च्या रिलीज डेटचे मोठे अपडेट समोर आले आहेत. त्याचप्रमाणे या सिरिजमध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
'पंचायत 4' च्या रिलीज डेटविषयी मोठे अपडेट
दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी आधीच खुलासा केला आहे की, त्यांनी पंचायत सीझन 4 आणि 5 वर काम सुरू केले आहे. म्हणजेच लेखकांनी स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. आता रिपोर्टनुसार, नवीन सीझनचे शूटिंग सुरू करण्यासाठी निर्माते पावसाळा संपण्याची वाट पाहत आहेत. नवभारत टाइम्सच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, नवीन सीझन 2026 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.मात्र, 'पंचायत 4' कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय, या मालिकेचे शुटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये मध्य प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे.
काय असेल 'पंचायत ४'ची स्टोरी लाईन?
जितेंद्र कुमार, सान्विका, नीना गुप्ता, रघुवीर यादव यांसारख्या स्टार्सनी 'पंचायत 3' मध्ये काम केले आहे. गेल्या सिझनमध्ये फुलेरा गावात प्रमुख होण्यासाठी लढत झाली. 'पंचायत 4'ची कथा निवडणुकीभोवती फिरणार असून यावेळी रिंकी आणि सचिवजींचा रोमान्स फुलणार की नाही हेही यामध्ये कळणार आहे. यावरून प्रल्हाद निवडणुकीत भाग घेणार की नाही हे पुढे स्पष्ट होईल.