Faisal Malik on Kangana Ranaut : शिव्या कार्यकर्ता खातो अन् सेलिब्रिटीला थेट खासदारकीचं तिकिट मिळतं, कंगनाच्या एन्ट्रीवर 'पंचायत'चे उपप्रधान प्रल्हादजी काय म्हणाले?
Faisal Malik on Kangana Ranaut : कंगना रणौतने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर कलासृष्टीत एकच चर्चा सुरु झाली. त्यावर पंचायतमधील प्रल्हादजींनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.
Faisal Malik on Kangana Ranaut : ग्रामपंचायतीमधलं राजकारणावर सध्या एक सीरिज प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरतेय. 'पंचायत 3' (Panchyat 3) या सिरिजमधील ग्रामपंचायत ही अनेकांना आवडलीये. खरंतर राजकारणाची खरी वीण ही ग्रामपंचायतीमध्येच असते. त्याच राजकारणावरील ही हलकी फुलकी सिरिज प्रेक्षकांना जास्तच भावतेय. या सिरिजसह या सिरिजमधील पात्रंही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. सचिवजीं, प्रधानजीं, मंजू देवी, विकास आणि प्रल्हाद चाचा ही टीम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरलीये. यामधील प्रल्हाद चाचा म्हणजेच अभिनेता फैजल मलिक (Faisal Malik) हा सध्या विशेष चर्चेत आला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हीने लोकसभेचं तिकीट मिळवतच राजकारणात प्रवेश केला. कंगनाला भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. कंगनाच्या या राजकारणातील प्रवेशावर प्रल्हाद चाचा अर्थातच अभिनेता फैझल मलिकने भाष्य केलं आहे. टिव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फैजल त्याची भूमिका मांडली.
कलाकारांनी अभिनयचं करावा - फैझल मलिक
कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर बोलताना फैजल म्हटलं की, मी कंगनाला चांगलं ओळखतो आणि ती खूप चांगली आहे. पण आता जी आहे ती कंगना नाही, ती आता दुसरी कोणीतरी आहे असंच वाटतंय. कारण ती पूर्वी अशी नव्हती. कलाकाराचं काम हे अभिनय करणं असते, तर त्याने फक्त तेच केलं पाहिजे, त्याने इतर गोष्टींमध्ये पडू नये, असं मला वाटतं. कंगनाची बहिण रंगोलीही मला चांगली ओळखते, आम्ही एकत्र कामही केलं आहे. तिच्यासोबत काम करण्याचाही अनुभव चांगला होता. कंगना रणौत ही एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, इतक्या मेहनतीने तिने जी गोष्ट शिकली आहे, तिने ती करावी. त्यावर तिने लक्ष केंद्रीत करावं. तिने बॉलीवूड सोडू नये, त्यामध्ये तिने आणखी काम करावं.
कार्यकर्त्यानेच खासदार व्हायला हवं - फैजल मलिक
राजकारण हे राजकारण्यांचं काम आहे, त्यामुळे कलाकारांनी राजकारणात जाऊ नये. राजकारण हे सातत्याने 24/7 चालणारं काम आहे. राजकारणासाठी एखाद्या कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करत असतो, पण त्याला डावलून मुंबईतून एखादी व्यक्त आणली जाते आणि तिला तिकीट देतात. यामुळे त्या कार्यकर्त्याचं मनं नक्कीच दुखावलं जातं. तो कार्यकर्ता त्या लोकांचा असतो, तो त्या लोकांमध्ये फिरलेला असतो. लोकांच्या शिव्या तो खातो, मग अचानक तुम्ही हिंदीमधून कोणालातरी आणता आणि त्याला सांगता की तू खासदार बन. हे अजिबात बरोबर नाही. कारण कार्यकर्त्यांनी खासदार व्हायला हवं, जो लोकांच्या अडचणी समजू शकतो, असंही फैजलने म्हटलं.