एक्स्प्लोर

Pak Actress Bushra Ansari Married At 69 Age: 'मला मोठ्या वयाच्या बायका आवडतात...'; सुप्रसिद्ध अभिनेत्यानं 69 वर्षांच्या घटस्फोटीत पाकिस्तानी अभिनेत्रीशी उरकलं लग्न

Pak Actress Bushra Ansari Married At 69 Age: ज्या वयात जवळपास सगळेच निवृत्ती घेऊन आराम करण्याचा प्लान करत असतात. त्या वयात बुशरा अन्सारी बोहोल्यावर चढल्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे.

Pak Actress Bushra Ansari Married At 69 Age: सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीनं (Pakistani Actress) वयाच्या 69 व्या वर्षी दुसरं लग्न (Second Marriage) करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बरं, पाकिस्तानी अभिनेत्रीपेक्षा तिनं ज्या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय, त्या अभिनेत्याच्या वक्तव्यानं सर्वांना हैराण केलं आहे. आम्ही ज्या पाकिस्तानी अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, त्या अभिनेत्रीचं नाव बुशरा अन्सारी. पाकिस्तानच्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये बुशरा अन्सारी यांनी कधी सासू, तर कधी आईच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्या पाकिस्तानी टेलिव्हिजन इंडस्ट्रीसोबतच (Pakistani Television Industry) लॉलिवूडमध्येही (Lollywood) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक केलं जातं. पण, सध्या बुशरा अन्सारी (Bushra Ansari) त्यांच्या कामापेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 

ज्या वयात जवळपास सगळेच निवृत्ती घेऊन आराम करण्याचा प्लान करत असतात. त्या वयात बुशरा अन्सारी बोहोल्यावर चढल्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. त्यासोबतच बुशरा यांनी ज्या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय त्या अभिनेत्याचं वक्तव्यही हैराण करणारं आहे. त्यामुळे दोघांनी लग्न केल्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वयात बुशरा यांनी लग्न केल्यामुळे पाकिस्तानी मीडियासोबतच संपूर्ण जगभरात उतारवयात केलेल्या या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी कोण? (Who Is Pakistani Actress Bushra Ansari?)

बुशरा अन्सारीचं पहिलं लग्न 1978 मध्ये झालं होतं. दरम्यान, तिनं 36 वर्षांनंतर 2014 मध्ये तिच्या पतीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर, अभिनेत्रीनं आता वयाच्या 69 व्या वर्षी अभिनेता इकबाल हुसेनशी दुसरं लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. इक्बाल हुसेन (Ikbal Husain), जे स्वतः एक अभिनेते आहेत आणि तेसुद्धा घटस्फोटीत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HideSide magazine (@hidesidemagazine)

इक्बाल हुसेन यांनी वयस्कर अभिनेत्री बुशरा अन्सारीशी लग्न का केलं? 

पाकिस्तानमधील रमजानच्या एका विशेष टॉक शोमध्ये, इकबाल हुसेन यांनी बुशरा अन्सारी यांच्याशी केलेल्या त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल उघडपणे सांगितलं, "बुशरा यांनी एकदा मला लग्न करायला सांगितलं होतं. तसेच, त्या म्हणालेल्या की, किती काळ एकटा राहशील?" मी त्यावेळी त्यांना म्हणालेलो की, "तुम्हीसुद्धा एकट्या आहात, मग तुम्हीच का नाही करत माझ्याशी लग्न? मला माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीच माझ्या वयाच्या मुली आवडल्या नाहीत, मला नेहमीच मोठ्या वयाच्या बायका आवडतात..."

"जेव्हा मी माझ्या मित्रांच्या घरी जायचो, तेव्हा मी त्यांना सांगायचो की, मला तुमच्या बहि‍णींशी घेणंदेणं नाही, पण तुमच्या आयांना माझ्यापासून धोका आहे..." जरी तो विनोद करत असल्याचा दावा करत असला तरी, त्याचा व्हिडीओ समोर आल्यापासून पाकिस्तानच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आईबद्दल केलेल्या अश्लील टिप्पणीबद्दलही त्यांच्यावर टीका होत आहे.

दुसऱ्या लग्नावर काय म्हणाल्या 69 वर्षांच्या बुशरा अन्सारी? 

बुशरा अन्सारी यांना विचारण्यात आलं की, त्या दुसऱ्या लग्नाला का तयार झाल्या? त्यांनी सांगितलं की, "माझ्या मनात दुसऱ्या लग्नाचा विचार नव्हता. घटस्फोटानंतर मी माझं आयुष्य एन्जॉय करत होते. इक्बालचा घटस्फोट होऊन सहा वर्ष झाली होती. तो एकटाच राहत होता. आम्ही कामाबद्दल बोलू लागलो आणि नंतर आमच्यात मैत्री झाली. मला वाटलं की, तो त्याच्या वयापेक्षा जास्त प्रौढ आहे, म्हणून मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला..." दरम्यान, बुशरा अन्सारी यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून दोन लहान मुली आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Wandering Minds India Sushil Ahire Kinjal Damani Emotional Post: 'आम्ही आमचं बाळ गमावलंय...'; मराठमोळ्या इन्फ्लुएन्सर कपलवर कोसळला दुःखाचा डोंगर

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget