एक्स्प्लोर

या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

या आठवड्यात घरबसल्या काय पाहायचं, याची संपूर्ण यादी जाणून घ्या.

OTT Upcoming this Week:OTT प्रेक्षकांसाठी हा आठवडा मनोरंजनाची पर्वणी घेऊन आला आहे. 13 ते 17 जुलैदरम्यान क्राइम थ्रिलर, अ‍ॅक्शन-कॉमेडी, रोमँटिक ड्रामा, ट्रू-क्राइम डॉक्युमेंट्री आणि कोरियन फँटसी अशा विविध धाटणीच्या चित्रपट आणि वेबसीरिज वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. 'रक्तांचल सीझन 3'पासून ते 'मर्डर 101' आणि 'द ईस्ट पॅलेस'पर्यंत अनेक बहुप्रतिक्षित रिलीज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या काय पाहायचं, याची संपूर्ण यादी जाणून घ्या.

रक्तांचल सीझन 3

'रक्तांचल सीझन 3' 16 जुलै 2026 पासून Amazon MX Player वर स्ट्रीम होणार आहे. ऋतम श्रीवास्तव दिग्दर्शित ही क्राइम ड्रामा मालिका पूर्वांचलमधील माफिया नेटवर्कवर आधारित आहे. मागील दोन सीझनप्रमाणेच ही मालिका प्रेक्षकांना कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता मोफत पाहता येणार आहे.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

तिसरी बेगम

के. सी. बोकाडिया लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित 'तिसरी बेगम' हा चित्रपट 18 जुलै 2026 रोजी Waves या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही प्रेक्षकांना मोफत पाहता येईल.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

सेकंड लव्ह

'बाहुबली' फेम अभिनेत्री रम्या कृष्णन होस्ट करत असलेला 'सेकंड लव्ह' हा तमिळ रिअॅलिटी डेटिंग शो 13 जुलैपासून JioHotstar वर स्ट्रीम होत आहे. 30 वर्षांच्या आसपास वय असलेल्या आणि यापूर्वी प्रेमभंगाचा अनुभव घेतलेल्या 12 सिंगल स्पर्धकांना या शोमध्ये सहभागी करण्यात आले आहे. जुन्या आठवणींमधून बाहेर पडून प्रेमाला पुन्हा एक संधी देण्याचा त्यांचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

राइड ऑर डाय

हॅना वॅडिंगहॅम आणि ऑक्टेव्हिया स्पेन्सर यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'राइड ऑर डाय' ही अ‍ॅक्शन-कॉमेडी मालिका 15 जुलैपासून Prime Video वर पाहता येणार आहे. एका महिलेचा आंतरराष्ट्रीय सुपारी किलर असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर दोन जिवलग मैत्रिणींचे आयुष्य कसे बदलते, याची कथा या मालिकेत आहे.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

डिजायर

लुडविका पॅलेटा आणि जोसे मारिया याझपिक यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'डिजायर' हा चित्रपट 17 जुलैपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. एका स्विमिंग कोचच्या आगमनानंतर एका कुटुंबाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या भावनिक आणि धोकादायक वळणाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

द हॉक

विल फेरेल अभिनित 'द हॉक' ही कॉमेडी मालिका 16 जुलैपासून Netflix वर प्रदर्शित होणार आहे. लॉनी हॉकिन्स उर्फ 'द हॉक' या वयस्कर व्यावसायिक गोल्फपटूची ही कथा आहे. हरवलेलं यश पुन्हा मिळवण्याचा आणि गोल्फमधील ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न या मालिकेत दाखवण्यात आला आहे.

वदरिंग हाइट्स

दिग्दर्शिका एमराल्ड फेनेल यांच्या 'वदरिंग हाइट्स' या रोमँटिक चित्रपटात मार्गोट रॉबी आणि जेकब एलॉर्डी मुख्य भूमिकेत आहेत. दोन व्यक्तींच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट 13 जुलैपासून JioHotstar वर पाहता येत आहे.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

मर्डर 101

'मर्डर 101' ही तीन भागांची ट्रू-क्राइम डॉक्युमेंट्री मालिका 13 जुलैपासून Prime Video वर स्ट्रीम होत आहे. अमेरिकेतील अनेक दशकांपूर्वीच्या 'रेडहेड मर्डर्स' प्रकरणावर आधारित या मालिकेत टेनेसीमधील एका हायस्कूलमधील समाजशास्त्राच्या वर्गातील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक अ‍ॅलेक्स कॅम्पबेल हे अनेक वर्षे न सुटलेल्या हत्याकांडांचा तपास करताना दिसतात.


या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

रेडी ऑर नॉट 2: हिअर आय कम

'रेडी ऑर नॉट' (2019) या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'रेडी ऑर नॉट 2: हिअर आय कम' हा कॉमेडी-हॉरर चित्रपट 16 जुलैपासून JioHotstar वर प्रदर्शित होणार आहे. समारा वीव्हिंग पुन्हा एकदा ग्रेस मॅककॉलेच्या भूमिकेत दिसणार असून, कॅथरीन न्यूटन, सारा मिशेल गेलर, शॉन हॅटोसी, डेव्हिड क्रोननबर्ग आणि इलायजा वूड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

द ईस्ट पॅलेस

'द ईस्ट पॅलेस' ही कोरियन फँटसी-थ्रिलर मालिका 17 जुलैपासून Netflix वर प्रदर्शित होणार आहे. नाम जू-ह्युक, रो युन-सो आणि चो सेउंग-वू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत आत्म्यांच्या जगात फिरू शकणारा एक तरुण आणि मृत व्यक्तींचे आवाज ऐकू शकणारी एक महिला राजाच्या आदेशानुसार एकत्र येऊन अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget